मुंबई

ज्युनिअर आंत्रप्रेन्युअर कार्यशाळा

CD

पुणे, ता. ११ : नवीन उद्योग सुरू करणाऱ्या व्यक्तीस आंत्रप्रेन्युअर म्हटले जाते. आजच्या धावपळीच्या युगात, जिथे तंत्रज्ञानाच्या सहाय्याने जगभरातील सीमांना पार करता येते, तेथे उद्योजकता ही एक महत्त्वाची आणि प्रेरणादायक दिशा बनली आहे. या पार्श्वभूमीवर १२ ते १८ वयोगटांतील विद्यार्थ्यांसाठी ज्युनियर आंत्रप्रेन्युअर ही चार तासांची कार्यशाळा शुक्रवारी (ता. १५) आयोजिली आहे. या कार्यशाळेत उद्योजकीय मानसिकता, स्टार्टअप प्रक्रियेची माहिती, व्यवसाय सादरीकरणाबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच, उद्योजकतेसाठी आवश्यक कौशल्ये, स्टार्टअप कसा सुरू करावा, कोणती रणनीती वापरावी आणि व्यवसाय कसा सादर करावा, याची माहिती दिली जाईल.

डिहायड्रेशन व्यवसाय प्रशिक्षण
निर्जलीकरण व्यवसाय संधींविषयी मार्गदर्शन करणारे प्रशिक्षण थेट निर्जलीकरण उद्योग प्रकल्पात शनिवारी (ता. १६) आयोजिले आहे. यात निर्जलीकरण म्हणजे काय, या तंत्रज्ञानाचे महत्त्व, उपयोग, व्यवसाय म्हणून तो कसा करावा, प्रमुख घटक, वेगवेगळ्या पद्धती, घटक पदार्थ व त्याचे उपयोग, उत्पादन व बाजारातील किंमत, मशिनरी, फ्लो चार्ट, बाजारपेठ, विपणन पद्धती, शासकीय योजना व अनुदान, जागेची निवड, गुंतवणूक, प्रकल्प अहवाल इ. विषयांवर मार्गदर्शन होणार आहे. फळभाज्या, पालेभाज्या, कंद, पानवर्गीय वनस्पती, आयुर्वेदिक वनस्पती, फळे, दुग्धजन्य पदार्थ, मांस, मच्छी, चिकन या पदार्थांचे प्रात्यक्षिक होणार आहे.

रोबोटिक्स व एआय समर कॅम्पचे आयोजन
विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देत रोबोटिक्स, कोडिंग आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) यांचे प्रात्यक्षिक शिक्षण देण्यासाठी दोनदिवसीय समर कॅम्पचे १८ व १९ मे रोजी आयोजन केले आहे. डिजिटल युगात मुलांनी केवळ तंत्रज्ञान वापरण्यापेक्षा रोबोटिक्स, एआय आणि इनोव्हेशन समजून घेणे आवश्यक असल्याने या कॅम्पमध्ये प्रत्यक्ष शिक्षणावर भर दिला आहे. प्रशिक्षणादरम्यान रोबोटिक्सची मूलभूत माहिती, सेन्सर्स, मोटर्स व मायक्रो कंट्रोलर्सची ओळख, तसेच रोबोट कोडिंग व प्रोग्रॅमिंग बेसिक्स शिकवले जाणार आहेत. यासोबतच एआय, फेस व इमोशन डिटेक्शन यांसारख्या उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना एआयची प्राथमिक माहिती दिली जाईल. या कॅम्पमुळे विद्यार्थ्यांमध्ये कोडिंग, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, सृजनशीलता आणि नावीन्यता इत्यादी कौशल्यांचा विकास होईल. सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देणार आहे.

‘एसआयआयएलसी’च्या विविध प्रशिक्षण व कार्यशाळांची माहिती मिळविण्यासाठी व नावनोंदणीसाठी
संपर्क : ८४८४८११५४४, ८९५६३४४४७२, ८९५६३४४४७१, ९३५६९७३४२७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Online Classes Appeal: ''शाळांनी ऑनलाईन क्लासेस घ्यावेत'', पंतप्रधान मोदींचं आवाहन

PBKS vs DC Live: प्रियांश आर्यचा पहिल्याच चेंडूवर कल्ला... स्टार्कला हाणला Six! नोंदवला भारी विक्रम, अक्षर पटेल स्तब्ध... Video Viral

New Railway Route : रेल्वेगाड्यांचा वेग वाढणार! कसारा-मनमाड नव्या रेल्वेमार्गिकेसाठी सर्वेक्षण

रासायनिक भेसळीवर राज्य सरकारचा दणका, दोषी व्यापाऱ्यांचे परवाने रद्द होणार

PBKS vs DC Live: दिल्ली कॅपिटल्सने प्लेइंग इलेव्हनमध्ये ५ बदल केले, पण Prithvi Shaw ला नाही खेळवले; पंजाब किंग्सच्या ताफ्यातही बदल

SCROLL FOR NEXT