मुंबई

पाताळगंगात पाण्याची नासाडी

CD

रसायनी, ता. ३० (बातमीदार) : पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रात एमआयडीसीची मुख्य जलवाहिनीच्या मार्गावर एक ठिकाणी पाणीगळती होत आहे. दरम्यान येथे गळती होऊन पाणी वाया जात असल्याने नागरिक नाराजी व्यक्त करत आहे. एमआयडीसीने दुरुस्तीचे काम करून पाणीगळती थांबवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील कैरे येथील एमआयडीसीच्या जलशुद्धीकरण केंद्राच्या मुख्य जलवाहिनीद्वारे पाताळगंगा आणि अतिरिक्त पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील कारखाने तसेच चावणा, जांभिवली, कराडे खुर्द या ग्रामपंचायतीच्या हद्दीतील गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो. इनॉक्स इअर प्रॉडक्ट लिमिटेड कंपनीच्या बाजूच्या जलवाहिनीला गळती लागल्याने पाणी गटारात मिसळत आहे. काही महिन्यांपासून दररोज पाण्याची नासाडी होत असल्याने कारखानदार आणि नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहे. ही पाणीगळती एमआयडीसीने थांबवण्यासाठी दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अशी मागणी कैरे गावातील अमित जंगम आणि नागरिकांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; विसर्जन मिरवणुकीमुळे पीएमपी बसच्या मार्ग आणि स्थानकांत बदल, हे आहेत पर्यायी मार्ग

Bank News :ग्राहकांसाठी रविवारी बँका सुरू; २८ ते ३० सप्टेंबरच्या संपाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

Nanded Farmers: ‘काजू-बदाम खा, पण शेतकऱ्यांना न्याय द्या’; अर्धापुरात काँग्रेसचा जनाक्रोश, घंटानाद करून दुष्काळ जाहीर

मुंबईकरांचा प्रवास सुसाट! ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह भुयारी मार्गासह 'ठाणे-बोरिवली'साठी दुय्यम कर्ज; सरकारचा मोठा निर्णय

Latest Marathi News Live Update : पुण्यात विसर्जन सोहळ्यासाठी महापालिकेची तयारी

SCROLL FOR NEXT