मुंबई

कामावरून काढल्याने मारहाण

CD

रसायनी, ता. ८ (बातमीदार) : वासांबे मोहोपाडा येथील एनआयएसएम येथील हाऊस कीपिंग व्यवस्थापक रामनाथ ढेरेंगे (३७, रा. चांभार्ली) याला मारहाण केल्याची घटना सोमवारी (ता. ६) सायंकाळी येथील रोडवर घडली. रामनाथ यांनी कामावरून काढल्याने प्रदीप पवार याला त्याचा राग आला होता. हा राग मनात धरून प्रदीप, त्याचे वडील आणि इतरांनी रामनाथ यांना मारहाण केल्याने रसायनी पोलिस ठाण्यात प्रदीप आणि इतरांविरोधात मंगळवारी (ता. ७) गुन्हा दाखल करण्यात आला.
प्रदीप पवार याला हाऊस कीपिंगच्या कामावरून काढून टाकण्यात आले होते. या गोष्टीचा मनात राग धरून प्रदीपने आपल्या वडिलांसह इतर मंडळी जमवले आणि रामनाथ यांची रस्त्यामध्ये अडवणूक केली. त्यानंतर प्रदीपच्या वडिलांनी लाकडी दांडक्याने मारहाण करून दुखापत केली. इतरांनी सुद्धा शिवीगाळ, दमदाटी करून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. रामनाथ यांच्यावर पनवेल येथे उपचार करण्यात आले आहे. या संदर्भात रामनाथ यांनी रसायनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अधिक तपास पोलिस शिपाई सौरभ पाटील करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT