मुंबई

पाताळगंगा नदीला जलपर्णीचा विळखा

CD

रसायनी पाण्याबरोबरच सांडपाण्यामुळे प्रदूषणात वाढ

रसायनी, ता. १ (बातमीदार) : पाताळगंगा नदीला जलपर्णीचा विळखा पडला आहे. एमआयडीसीच्या उदंचन केंद्रातील सांडपाणीबरोबरच बंधाऱ्यातील पाण्यावर जलपर्णी जमा झाल्‍याचे दिसते आहे. अनेक कारखानदार रासायनिक पाणी नदीपात्रात सोडतात. काही गावांतील सांडपाणीही सोडले जात असल्‍याने नदी प्रदूषित झाली आहे. अडीच तीन महिन्यांपासून नदीत मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाढली आहे. ही जलपर्णी काढून नदीपात्राची साफसफाई करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.
खोपोली, पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रात अनेक कारखाने आहेत. सर्वच कारखान्यातील सांडपाण्यावर याठिकाणी प्रक्रिया झाल्‍यास कोणी चोरून दूषित पाणी नदीत सोडणार नाहीत. शिवाय नागरी वसाहतींतही ग्रामपंचायतींच्या माध्यमातून प्रक्रिया केंद्र उभारून सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता विनायक भोईर यांनी स्‍पष्‍ट केले आहे.

पाताळगंगा नदीवर एमआयडीसीच्या जॅकवेलमधील अशुद्ध पाणी येते. साठवण बंधाऱ्यात पाण्याबरोबर जलपर्णी मोठ्‌या प्रमाणात वाहत येते. जलपर्णी बंधाऱ्यात अडकली तर पाणी पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो. खबरदारी म्हणून वेळोवेळी जलपर्णी काढण्यात येत आहे.
- विठ्ठल पाचपुंडे, उपअभियंता, एमआयडीसी

सीईटीपी केंद्रात एमआयडीसीतील अनेक कारखान्यांतील रासायनिक सांडपाण्यावर प्रकिया करण्यात येते. कारखान्यातील प्रदूषित सांडपाणी सीईटीपी केंद्रात सोडताना पाण्याचे नुमने तपासणी करण्यात येतात. केंद्रात प्रक्रिया झालेले पाणी समुद्रात सोडण्यात येते.
- अमित शेट्टी, सीईटीपी, विभाग प्रमुख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Businessman Cheating Wife : गर्लफ्रेंडसोबत मलेशियाला जाण्याचा प्लॅन; पत्नीला सांगितले बिझनेस ट्रिप, विमानतळावरच बिंग फुटले, पुण्यातील उद्योगपतीचा कारनामा

Asian Games: भारताच्या लेकींचा धुमाकूळ! एलावेनिलचे दुहेरी यश, तर सचिकाचे MMA मध्ये पदक पक्के अन् क्रिकेटमध्येही वाजवला डंका

सोन्याच्या हव्यासापोटी सात मित्र पोहोचले शापित हवेलीत; ‘भूतम् भयम्’चा थरार कुठे आणि कधी पहायला मिळणार?

गणरायाला निरोप देताना आक्रित घडलं! कृत्रिम तलावात शॉक लागून १९ वर्षीय तरूणाचा मृत्यू; लेकाचा मृतदेह पाहून वृद्ध वडिलांचा आक्रोश

ASTROLOGY: या ३ तारखांना जन्मलेले लोक असतात कुबेराचे लाडके? धन-दौलत, प्रॉपर्टीच्या बाबतीत मिळतो भाग्याचा साथ; तुमची जन्मतारीख कोणती?

SCROLL FOR NEXT