मुंबई

बस बंद पडल्यामुळे प्रवाशांची गैरसोय

CD

रसायनी, ता. २० (बातमीदार) : रसायनी परिसरातील वाशिवलीपर्यंत नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन उपक्रमाअंतर्गत बेलापूर-पनवेल-दांड मार्गे वाशिवली परतीच्या बसफेऱ्या चालवण्यात येतात. दरम्‍यान बस नादुरुस्‍त होण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे गैरसोय होत असल्याने प्रवाशांमधून नाराजी व्यक्‍त होत आहे. शनिवार (ता.१८) सकाळी साडेदहाच्या सुमारास वासांबे-मोहोपाडा येथील वीज महावितरणच्या कार्यालयाजवळ पनवेलहून वाशिवलीकडे जाणारी बस बंद पडली. त्यामुळे मोहोपाडा, पिल्लई महाविद्यालय, पाताळगंगा औद्योगिक क्षेत्र, वाशिवली आदी ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय झाली तर शुक्रवारी सकाळी वाशिवली, मोहोपाड्याहून साडेनऊ वाजता पनवेलकडे जाणारी बस जुन्या राष्ट्रीय महामार्गवरील शेंडुग टोल नाक्याजवळ बंद पडली होती, असे प्रकाश म्हात्रे या प्रवाशाने सांगितले. बस नादुरुस्‍त झाली की वाहक मागून येणारी बस थांबवून त्‍यात प्रवाशांना बसवतात, मात्र यात वेळे वाया जातो शिवाय प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. एनएमएमटीने बसच्या देखभाल-दुरुस्‍तीकडे लक्ष द्यावे, नादुरुस्‍त बस मार्गस्‍थ करू नये, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नालासोपारा ZP शाळेत कुकरचा स्फोट; भडका उडताच गरम खिचडी चिमुकल्यांच्या अंगावर; 2 विद्यार्थ्यांसह महिला जखमी

Kharge Rally Controversy : मल्लिकार्जुन खर्गेंच्या रॅलीनंतर 'शुद्धीकरण' वाद पेटला! राज्यभरातून 80 तक्रारींनंतर पोलिसांचं मोठं पाऊल, काय आहे नेमकं प्रकरण?

मुंबईत पीएम मोदींच्या कार्यक्रमापूर्वी सुरक्षेत मोठी त्रुटी! बंदूकधारी अन् बनावट PMO अधिकाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Marathi News Live Updates : मिरवणूक बंदीकडे चाललेली पावले थांबली नाहीत तर भविष्यात उत्सवच बंद होतील - साऊंड असोसिएशन

नावही माहिती नसलेल्या खेळांचे बोगस प्रमाणपत्र! वर्ग १ आणि वर्ग २च्या नोकऱ्या मिळवल्या; दोघे अटकेत, एक हजार सर्टिफिकेट वाटल्याचा दावा

SCROLL FOR NEXT