मुंबई

दुबार भात पिकाला धोका

CD

रसायनी, ता. २ (बातमीदार)ः रसायनी परिसरात भात कापणीचे काम सुरू झाली आहेत. यंदा दुबार भाताचे पीक चांगले आल्‍याने शेतकरी आनंदात आहे. मात्र मंगळवारी(ता.२) परिसरात पावसाच्या सरी कोसळल्‍याने शेतकऱ्यांची काळजी वाढली. खराब हवामान, अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास वाया जाईल, या भीतीने शेतकरी धास्तावले असून कापणी केलेला भात भिजू नये, म्‍हणून खबरदारी घेत आहे.
नदी काठच्या गावातील शेतकऱ्यांना पाताळगंगा आणि रिस नदीच्या पाण्याचा, वासांबे- मोहोपाडा येथे एमआयडीसीच्या जलशुद्धीकरण केंद्रांमधून सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्याचा याशिवाय जांभिवलीतील शेतकऱ्यांना माणिक गडाच्या पायथ्याशी असलेल्या बामणोली धरणाच्या पाण्याचा आधार आहे. रसायनी पाताळगंगा परिसरातील सिंचनाचा आधार असलेले शेतकरी दुबार भात आणि भाजीपाल्याचे पीक घेत आहे. यंदाच्या हंगामात परिसरातील शेतकऱ्यांची भात लावणीची कामे फेब्रुवारी महिन्यात पहिल्या आठवड्यात वेळेत पूर्ण झाली. सुरुवातीला पेरणी, रोपांची वाढ आणि त्यानंतर लावणीसाठी दीड-दोन महिने अनुकूल आणि पोषक वातावरण असल्याने पिकाची वाढ चांगली झाली असून काही ठिकाणी कापणीही सुरू करण्यात आली आहे.
गेल्‍या आठवड्यात रसायनी परिसरात पावसाच्या हलक्या सरी पडल्या होत्या, तसेच वासांबे मोहोपाडामध्ये मंगळवारी सकाळीही पुन्हा हलक्या सरी पडल्या. पावसामुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नाही, मात्र शेतकऱ्यांची तसेच वीट व्यावसायिकांची तारांबळ उडाली. सध्या तापमान वाढले असून ढगाळ वातावरणामुळे उष्‍माही वाढला आहे. त्‍यातच अधूनमधून पाऊस येत असल्‍याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

दोन दिवसांपूर्वी कापणीचे काम सुरू केली आहे. दरम्यान ढगाळ वातावरणामुळे उकाडाही वाढला आहे. कापणीनंतर पुढील काही दिवस भात रचून ठेवणार आहे. खराब हवामान निवळल्यावर झोडपणीचे काम करणार आहे.
- वामन दळवी, वासांबे मोहोपाडा, शेतकरी
..............

रेवदंड्याला पावसाने झोडपले
रेवदंडा, ता. २ (बातमीदार)ः तापमानाचा पारा वाढल्‍याने अवकाळी पावसाची शक्‍यता वर्तवण्यात आली होती. मंगळवारी पहाटे चारच्या सुमारास पावसाच्या जोरदार सरी कोसळल्‍या. पावसामुळे हवेत सुखद गारवा निर्माण झाल्याने नागरिक सुखावले. तर आंब्याची प्रतवारी घसरण्याच्या शक्‍यतेने बागायतदार अडचणीत आले आहेत.

................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission of India : एसआयआरवरून निवडणूक आयोगातच मतभेद; दोन आयुक्तांनी दहा महिन्यांत १४ वेळा नोंदवले आक्षेप

'काही वाईट असेल ते माझ्याबाबत होऊ दे' बहिणीच्या प्रीमॅच्युअर बाळासाठी जुईची खाटूश्यामबाबांकडे प्रार्थना, अनुभव सांगत म्हणाली...

Asian Games 2026 : क्रिकेटची आवड असलेल्या Jay Meena ने इतिहास रचला! भारताला सॉफ्ट टेनिसमध्ये जिंकून दिले पहिले आशियाई पदक... जाणून घ्या कोण आहे तो?

Marathi News Live Updates : जम्मू-काश्मीरमधील गँगस्टर करनजीत गुग्गाला दिल्लीत अटक

Gold Rate Today: दसऱ्याआधी सोनं स्वस्त! सराफा बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण; तुमच्या शहरात ताजा भाव पाहा

SCROLL FOR NEXT