मुंबई

वासांबे मोहोपाडा परिसरात जनावरांचे लसीकरण

CD

रसायनी, ता. १० (बातमीदार) : रसायनीतील वासांबे मोहोपाडा येथील पशु वैद्यकीय दवाखान्या अंतर्गत गावातील गाय वर्गातील जनावरांना लंपी प्रतिबंध लस देण्याच येत आहे. गतवर्षी गाय वर्गातील जनवांराना लंपीची बाधा झाली होती. यात वासांबे मोहोपाडा परिसरात एक जनावरांचा मृत्यू झाला होता आणि काही जनावरे बाधित झाली होती. दरम्यान यंदा खबरदारी म्हणून जुलै महिन्यात शासनाच्या सर्व पशुवैद्यकीय दवाखान्यांनी लंपी चर्म रोग नियंत्रण लस देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. यासाठी पंचायत समितीकडून लसीकरणाचा पुरवठा करण्यात आलेला असून, मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्यावर भर देण्यात येत आहे. यावेळी लसीकरणासाठी पशुपालकांनी आपल्या नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यास संपर्क साधावा, तसेच गावातील लसीकरण मोहिमेदरम्यान आपली गाय वर्गीय जनावरे गोठ्यात बांधून ठेवावीत व त्यांना आवश्यक लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन वासांबे मोहोपाडा येथील पशुधन अधिकारी प्रशांत कोकरे यांनी पशुपालकांना केले आहे. दरम्यान वासांबे मोहोपाडा पशुवैद्यकीय दवाखानाला ३०० लंपी लस प्राप्त झाली आहे, आतापर्यंत ६७ गाय, २४ बैल व ९ वासरे आशी एकुण शंभर जनवांराना लस दिली आहे. असे डॉ. कोकरे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT