साळावमधील विद्यामंदिरात युवकवर्गासाठी व्यासपीठ परिषद
रेवदंडा, ता. २४ (बातमीदार) : मुरूड तालुक्यातील साळावमधील जिंदल विद्या मंदिराच्या सभागृहात युवकांना जागतिक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी एका परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
या परिषदेत पी. एन. पी. होली चाइल्ड स्कूल-अलिबाग, जिंदल माऊंट लिट्रा झी स्कूल नागोठणा आणि मेग्रोरियन स्कूल रोहा या नामांकित शाळांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. प्राचार्य मुकेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यांनी प्रास्ताविकात या उपक्रमाबाबत सखोल माहिती दिली. जागतिक समस्यांवर विचारमंथन करण्यासाठी नेतृत्व, कौशल्य विकसित करण्यासाठीं आणि सार्वजनिक ठिकाणी वक्तृत्वाची छाप पडण्यासाठी या उपक्रमांतून युवकांचे प्रबोधन करण्यात आले. जागतिक समस्यांवर चर्चा करण्यात आली. सयंमित व असयंमित गट चर्चा, प्रस्ताव, मसुद्याची निर्मिती आणि इतर महत्त्वाच्या उपक्रमांमध्ये चर्चा झाली. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पंकज मलिक यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. सर्वोत्कृष्ट प्रतिनिधी आणि सर्वोत्कृष्ट संशोधक या श्रेणीत प्रत्येकी सहा पुरस्कार देण्यात आले. उत्कृष्ट योगदान दिल्याबद्दल जिंदल माऊंट लिट्रा झी स्कूल (नागोठणा) यांना चषक देण्यात आला. परिषद यशस्वी करण्यासाठी वर्धन बरसे, अक्षरा जगे, दर्श कांबळे, अनिका चव्हाण, स्पंदन देशमुख या विद्यार्थ्यांनी सुत्रसंचलन केले. निलू मलिक व शिक्षक वृंद, युवक विद्यार्थी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.