रेवदंड्यात श्री सत्य साईबाबा जन्मशताब्दीनिमित्त सेवा उपक्रम
रेवदंडा (बातमीदार) ः रेवदंडा–अलिबाग हमरस्त्यावरील धोबन तळ्यासमोरील प्रशांती सभागृहात अध्यात्मिक गुरु श्री सत्य साईबाबा यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त रविवारी (ता.२३) विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. श्री साई भक्त समूहातर्फे आयोजित या कार्यक्रमात प्रेम, सेवा आणि मानवकल्याण या तत्त्वांवर आधारित उपक्रम राबविण्यात आले. सभागृह आकर्षक पद्धतीने सजविण्यात आले होते. पहाटे ओंकार सुप्रभातम व नगर संकीर्तनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर जन्मोत्सव भजन, आरती व भक्तिमय कार्यक्रम पार पडले. यावेळी श्री साई नेत्रालय दालन सुरू करण्यात आले. पुणे व अलिबाग येथून आलेल्या नेत्रतज्ञ डॉक्टरांनी सुमारे साठ नागरिकांची मोफत नेत्रतपासणी केली. तसेच वृद्धाश्रम व मुकबधिर विद्यालयात अन्नदान करून नारायण सेवा करण्यात आली. पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्री सत्य साईबाबा यांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले. संपूर्ण परिसर भक्तिमय आणि सेवाभावाने भारावून गेला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.