मुंबई

रेवदंडा बसस्थानकात अवैध पार्किंगमुळे कोंडी

CD

रेवदंडा बसस्थानकात अवैध पार्किंगमुळे कोंडी
वाहतूक नियंत्रणाचा अभाव; प्रवाशांमध्ये संताप
रेवदंडा, ता. ५ (बातमीदार) ः रेवदंडा येथील बसस्थानक हे बंदर परिसरात असून रोहा, मुरूड व अलिबागकडे ये-जा करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाचे केंद्र आहे. मात्र अलिबाग आगाराच्या कार्यक्षेत्रात असूनही येथे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार आहे. रेवदंडा बसस्थानकात अलिबाग आगारामार्फत अर्धवेळ वाहतूक नियंत्रक नियुक्त करण्यात आला आहे. मात्र दर रविवारी हा कक्ष बंद ठेवण्यात येतो. त्‍यामुळे स्‍थानकात बेकायदा पार्किंग मोठ्या प्रमाणात केले जात आहे. त्‍यामुळे परिसरात कोंडी होत असून याचा त्रास सामान्य प्रवाशांसह वाहनचालकांना होत आहे. त्‍यामुळे आगार परिसरातील बेकायदा पार्किंगवर आळा घालण्यात यावा, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
रेवदंडा येथील बसस्थानक हे महत्त्वाच्या बंदर परिसरात असून थेट पोलिस ठाण्याच्या संरक्षित भिंतीलगत आहे. रोहासारखी औद्योगिक वसाहत, मुरूडसारखा ‘प्रति गोवा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पर्यटन तालुका तसेच अलिबाग शहराशी जोडणारे हे बसस्थानक प्रवाशांसाठी मध्यवर्ती व वर्दळीचे ठिकाण मानले जाते. दररोज शेकडो प्रवासी या बसस्थानकावरून प्रवास करत असतात. मात्र, इतके महत्त्वाचे बसस्थानक असूनही अलिबाग आगाराच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या या ठिकाणी प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याची तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. रेवदंडा बसस्थानकात अलिबाग आगारामार्फत अर्धवेळ वाहतूक नियंत्रक नियुक्त करण्यात आला आहे. मात्र दर रविवारी हा कक्ष बंद ठेवण्यात येतो. विशेष म्हणजे रविवारीच पर्यटनाचा दिवस असल्याने मुरूड, काशीद, नागाव आदी पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या पर्यटकांची मोठी गर्दी स्‍थानकात दिसून येते. अशा वेळी बसस्थानकावर कोणतेही नियंत्रण नसल्याने खासगी चारचाकी व दुचाकी वाहने थेट बसस्थानकाच्या आवारात उभी केली जात आहेत. परिणामी अवैध पार्किंगचा सुळसुळाट झाला असून, मुळातच खड्डेमय झालेल्या बसस्थानकात अपघाताचा धोका अधिक वाढला आहे.
......................
गाड्यांना वळण घेण्यास अडचण
या बसस्थानकाच्या तीन बाजूंना असलेले तारेचे संरक्षक कुंपण पूर्णपणे नष्ट झाले आहे. त्यामुळे कोणतीही व्यक्ती किंवा वाहन सहजपणे बसस्थानकात प्रवेश करू शकते. रविवारी तर स्‍थानिकांची वाहने थेट प्लॅटफॉर्मजवळ उभी राहत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे एसटी महामंडळाच्या लालपरी गाड्यांना वळण घेणे अवघड होत असून, चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. एखादा मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्‍यामुळे बसस्थानकाच्या आवाराभोवती संरक्षित भिंत उभारावी, तुटलेले कुंपण त्वरित दुरुस्त करावे तसेच खासगी वाहनांना प्रवेश बंदी करावी, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Schedule: मुंबई इ़ंडियन्ससाठी 'हे' वेळापत्रक लकी ठरणार! २०१९ नंतर जुळून आलाय योगायोग, सहावी ट्रॉफी आपलीच

Tanaji Malusare : कोण आहेत नरवीर तानाजी मालुसरे यांचे वंशज? आता कुठे असतात अन् कशी आहे परिस्थिती..पाहा शिवरायांच्या वीर मावळ्याची पिढी

Latest Marathi News Live Update : एकनाथ महाराज नाथषष्ठी सोहळ्याची सांगता

LPG Gas Shortage: ''घाबरु नका, अडीच दिवसांमध्ये गॅस मिळेल'', पेट्रोलियम मंत्रालयाची पत्रकार परिषद

IPL 2026 Full Schedule : आयपीएलच्या पहिल्या २० सामन्यांत CSK, RCB, MI, PBKS, GT, LSG, RR, SRH, KKR, DC यांच्या वाट्याला किती सामने? संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT