मुंबई

विद्यार्थी वर्गाचे "लेझीम नृत्य" ठरले लक्षवेधक.

CD

रेवदंड्यात विद्यार्थ्यांचे बहारदार ‘लेझीम नृत्य’
रेवदंडा, ता. २६ (बातमीदार) ः रामनवमी उत्सवाचे औचित्य साधून रेवदंडा येथील मारुती आळीतील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी लेझीम नृत्य सादर केले. पारंपारिक वेशभूषा आणि लयबद्ध सादरीकरणामुळे या विद्यार्थी पथकाने नागरिकांचे विशेष लक्ष वेधून घेतले.
शाळेपासून या लेझीम पथकाची सुरुवात झाली असून पारनाका मार्गे बाजारपेठेतील श्रीराम मंदिरापर्यंत ही मिरवणुकी काढली होती. यामध्ये एका विद्यार्थ्याने साकारलेली प्रभू श्रीरामाची वेशभूषा आकर्षणाचे केंद्र ठरली. नागरिक भारती मोरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या श्रीराम लेझीम पथकाचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. या उपक्रमात सरपंच प्रफुल्ल मोरे, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, चौल केंद्र शाळेतील शिक्षक वृंद उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक उल्हास राणे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.या लेझीम पथकाची रेवदंडा बाजारपेठेतील मंदिरात सांगता झाली. याप्रसंगी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. संदेश कादे यांनी लेझीम नृत्य पाहून विद्यार्थ्यांना दोन हजार रुपये बक्षीस दिले.
अलिबाग तालुक्यातील चौल मधील-सागमळा मधील राम मंदिर, चौल चौकी येथील मंदिरात रामनवमनिमित्त विविध कार्यक्रम पार पडले. मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात आली होती.

रेवदंडा-बातमीदार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: पंजाब किंग्सचा सलग चौथा पराभव; दिल्ली कॅपिटल्सने Playoff चे गणित बिघडवले; CSK, KKR, RR ला संधी...

Big News: राहुल द्रविड बनला ट्वेंटी-२० संघाचा मालक; भारताशिवाय 'ज्या' देशाकडून खेळलेला, तिथेच युवा टॅलेंट शोधण्यासाठी परतला...

Operation Clean: अवैध मद्यनिर्मितीविरोधात महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! राज्यभर ‘ऑपरेशन क्लीन’ सुरू; कायदा आणखी कडक

Iran Peace Proposal: मिडल ईस्टमध्ये शांततेची शेवटची आशा संपली? अमेरिकेने इराणचा प्रस्ताव फेटाळला; तेलाच्या किंमतीत वाढ

Mumbai Local: मुंबई लोकल वाहतूक विस्कळीत, काही फेऱ्या रद्द; अनेक गाड्या २० मिनिटांपर्यंत उशिराने

SCROLL FOR NEXT