मुंबई

अपघात प्रकरणी ठेकेदारांवर गुन्हे दाखल.

CD

रस्ते अपघातप्रकरणी ठेकेदारांवर गुन्हे दाखल
रेवदंडा, ता. ५ (बातमीदार) ः रस्त्याच्या कामात सुरक्षिततेच्या नियमांकडे दुर्लक्ष करणे ठेकेदारांच्या अंगलट आले आहे. वावे ते चौल नाका यादरम्यान सुरू असलेल्या रस्तेकामात सुरक्षेचे फलक लावले नसल्याने अपघात झाला आहे. याप्रकरणी आर. के. मदानी ॲण्ड कंपनी आणि एस. महेश्वरी ॲण्ड कंपनी या दोन ठेकेदार कंपन्यांवर रेवदंडा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत.
अलिबाग तालुक्यातील वावे ते चौल नाका या मार्गावर सध्या सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. चौल बीबी गावच्या हद्दीत नाला बांधण्यासाठी रस्त्यावर ८ ते १० फूट खोल खड्डा खणण्यात आला. मात्र, या ठिकाणी सूचनेचा कोणताही फलक किंवा सुरक्षेची उपाययोजना केलेली नव्हती. शुक्रवारी (ता. ३) रात्री रामनाथ फसाळा हे मोटारसायकलवरून रेवदंडाकडे जात असताना, अंधारात खड्डा दिसून आला नाही व त्यांची गाडी थेट खड्ड्यात कोसळली. या अपघातात रामनाथ यांना गंभीर दुखापत झाली आहे. याची तक्रार रामनाथ यांची आई जयश्री फसाळा यांनी रेवदंडा पोलिस ठाण्यात नोंदवली. यानुसार आर. के. मदानी ॲण्ड कंपनी व एस. महेश्वरी ॲण्ड कंपनी या ठेकेदारांवर गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक दगू गांगुर्डे पुढील तपास करीत आहेत. दरम्यान, मागील महिन्यात साळाव ते मुरूड रस्त्याचे काम सुरू असताना योग्य सुरक्षितता न घेतल्याने वन कर्मचाऱ्याला जीव गमवावा लागला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder 5 KG पाच किलो एलपीजी सिलिंडरबाबत नवा नियम, खरेदीसाठी ओळखपत्र बंधनकारक

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

SCROLL FOR NEXT