चौलमध्ये स्वामी समर्थ पालखी सोहळा
अकराव्या वर्षी मिरवणूक, भजन-कीर्तनांनी भक्तिमय वातावरण
रेवदंडा, ता.१५ (बातमीदार) : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ (ट्रस्ट), अक्कलकोट यांच्या वतीने स्वामी समर्थ पालखी परिक्रमेचे आयोजन चौल येथील शितळादेवी मंदिरात सलग अकराव्या वर्षी उत्साहात पार पडले. मंगळवारी (ता.१४) चौल अष्टविनायक मंदिर, सोंडेपार ते शितळादेवी मंदिर दरम्यान मिरवणूक काढण्यात आली. ‘मनीध्यास एकच ठेवा, नित्य करावी स्वामी सेवा’ या जयघोषाने परिसर दुमदुमला होता.
मिरवणुकीत रेवदंडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या श्रीराम लेझीम पथकाने आकर्षक सादरीकरण करत रंगत वाढवली. शितळादेवी मंदिरात आरती व पादुका दर्शन सोहळा पार पडला. त्यानंतर पंचक्रोशीतील भजनी मंडळांच्या सहभागाने भजनांचा जंगी कार्यक्रम झाला.
बुधवारी (ता.१५) पहाटे पादुकांना अभिषेक करून पालखीचे अलिबागकडे प्रस्थान झाले. कार्यक्रमासाठी स्थानिक नागरिकांचा मोठा सहभाग लाभला.
बातमीला सजवलेल्या वाहनांतून पालखी सोहळा मंदिरात जात असताना तर दुसरा फोटोत विद्यार्थ्यांनी श्रीराम लेझीम पथकाने पालखी सोहळ्यात रंगत आणली असे दोन फोटो बातमीला पाठवले आहेत.
रेवदंडा-बातमीदार.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.