मुंबई

लालपरी अचानक रद्द झाल्यामुळे प्रवाशांना भुर्दंड

CD

रेवदंडा-रोहा एसटी वारंवार रद्द
प्रवाशांचा संताप वाढला
चाकरमानी, विद्यार्थी आणि प्रवाशांना खासगी वाहनांचा पर्याय; प्रशासनाकडून दखल घेण्याची मागणी
रेवदंडा, ता. ७ (बातमीदार) : रेवदंडा बस स्थानकातून दुपारी २ वाजता सुटणारी रेवदंडा-रोहा एसटी (लालपरी) वारंवार अचानक रद्द होत असल्याने प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. ही बस रद्द झाल्यास प्रवाशांना पुढील ३ वाजताच्या बसची वाट पाहावी लागते किंवा खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो.
या बसवर रोहा मार्गे दिवा रेल्वेने प्रवास करणारे चाकरमानी मोठ्या प्रमाणात अवलंबून आहेत. बस रद्द झाल्यास त्यांच्या कामाच्या वेळापत्रकावर परिणाम होतो. वळके, चोरडा, कोकबन, चणेरा या गावांतील प्रवासी आठवड्यातून किमान एकदा तरी या सेवेमुळे प्रवास करतात.
मुरूड आगारातून सकाळी भांडुपकडे जाणारी बसही अनेकदा रद्द होत असल्याने समस्येत भर पडत आहे. बस स्थानकातील वाहतूक नियंत्रक कक्ष सकाळी उशिरा उघडत असल्याने प्रवाशांना योग्य माहिती मिळत नाही. उन्हाळी सुट्ट्या आणि लग्नसराईच्या हंगामात ही समस्या अधिक तीव्र झाली आहे.
प्रशासनाने या बाबीकडे तातडीने लक्ष देऊन बससेवा नियमित करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PORTUGAL VS UZBEKISTAN: ख्रिस्तियानो रोनाल्डोचे विक्रम, विक्रम, विक्रम... पोर्तुगालचा ५-० असा दणदणीत विजय, Fifa World Cup च्या बाद फेरीच्या दिशेने कूच

Cristiano Ronaldo Record: ६० वर्ष एकाच व्यक्तीच्या नावे होता विक्रम, रोनाल्डोने ३३ मिनिटांत मोडला! गोलरक्षकाला गंडवलं Video तुफान Viral.. मेस्सीही मागे पडला

Cristiano Ronaldo Record: "नाद करा, पण आमचा कुठं..." ख्रिस्तियानो रोनाल्डो आला अन् मैदान गाजवलं; रेकॉर्ड ब्रेकिंग गोल्स Video Viral

Cristiano Ronaldo Create History: अविश्वसनीय! रोनाल्डोचा विश्वविक्रम; World Cup मध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच, मेस्सीचाही विक्रम मोडला, Video

Tanker Mafia : नागरिकांची आर्थिक पिळवणूक! टँकरमाफियांना महापालिकेची फूस; अवाच्या सवा दराने पाण्याची विक्री

SCROLL FOR NEXT