मुंबई

जिंदल विद्या मंदिर बारावीच्या निकालात यश.

CD

जिंदाल विद्यामंदिरचे बारावीच्या निकालात यश

रेवदंडा, ता. १४ (बातमीदार) ः मुरूड तालुक्यातील साळाव येथील जिंदाल विद्यामंदिर विद्यालयाने सीबीएसई बारावीच्या निकालात शंभर टक्के यशाची परंपरा यंदाही कायम राखली आहे. बुधवारी (ता. १३) जाहीर झालेल्या निकालात परीक्षेला बसलेल्या सर्व ३२ विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण होत उल्लेखनीय यश मिळवले.
वाणिज्य शाखेत स्वयम वाकडे याने ८६ टक्के गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला. इबाद मुकादम (८५ टक्के) द्वितीय, तर कृष्णा दिवेकर (७४ टक्के) तृतीय ठरली. विज्ञान शाखेत सोहम घरत याने ७९ टक्के गुण मिळवत अव्वल स्थान मिळवले. अन्वेशा भट्टाचार्य (७८ टक्के) द्वितीय, तर इस्माईल मुकादम (७६ टक्के) तृतीय क्रमांकावर राहिला.
या यशाबद्दल प्राचार्य मुकेश ठाकूर यांनी शिक्षकांचे मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांची मेहनत हेच यशाचे सूत्र असल्याचे सांगितले. उपप्राचार्य मंगेश बमनोटे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पंकज मलिक, जे.ई.टी. प्रमुख डॉ. भावेश भालेराव व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Coastal Road Closed : मुंबई कोस्टल रोड उद्या ५ तास बंद... कसे असतील पर्यायी मार्ग, प्रवास करण्यापूर्वी नक्की वाचा

Nitin Gadkari : अक्कलकोट विधानसभेच्या आणखी दोन महत्त्वाच्या कामाला मंजुरी देण्याची गडकरींची घोषणा; विकास कामात राजकारण न करण्याचे केले आवाहन

Pune News : पेशवेकालीन भूमिगत जलवाहिनी जीर्णोद्धारास स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी

CGHS नियमांमध्ये मोठा बदल! आता आई-वडील किंवा सासू-सासरे यांच्यापैकी एकालाच मेडिकल लाभ मिळणार; नवा नियम लागू

PBKS vs MI Live : शार्दूल ठाकूरची 'स्टम्प' तोड गोलंदाजी! पंजाबने ३३ धावांत गमावले ६ फलंदाज; 'लॉर्ड'च्या ४ विकेट्सने फिरली मॅच Video

SCROLL FOR NEXT