मुंबई

गणेशोत्सवासाठी रेवदंडा बाजारपेठ सज्ज

CD

गणेशोत्सवासाठी रेवदंडा बाजारपेठ सज्ज
पूजा साहित्याची आवक वाढली; आर्थिक मंदीमुळे ग्राहकांची प्रतीक्षा
रेवदंडा, ता. १० (बातमीदार) : गणेशोत्सव अवघ्या तीन दिवसांवर आल्याने रेवदंडा बाजारपेठ गणेशभक्तांच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे. गणेशोत्सवासाठी आवश्यक विविध पूजा साहित्याची आवक झाली असून, दुकाने सजली आहेत, मात्र पावसाचे घटलेले प्रमाण आणि आर्थिक मंदीचा परिणाम बाजारपेठेतील खरेदीवर जाणवत असून, अपेक्षित गर्दी अद्याप दिसून येत नाही.
गणेशपूजेसाठी १० रुपयांपासून एक हजार रुपयांपर्यंतच्या सुवासिक अगरबत्त्या बाजारात उपलब्ध आहेत. धुपाचा दर किलोमागे ३०० ते १ हजार रुपये असून कापूरच्या डब्यांची किंमत १० ते ४०० रुपयांपर्यंत आहे. उंची कापूर दोन हजार रुपये किलोच्या आसपास उपलब्ध आहे. गणपतीसाठी विविध आकार व रंगांतील कंठहार ५० ते ५०० रुपये किमतीत विक्रीसाठी आले आहेत.
पूजा साहित्यामध्ये कुंकू, हळद, गुलाल, सुपारी, जानवे, अत्तर, मध, शेला आदी वस्तूंचे संच ७० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. काही संचांमध्ये आरती संग्रहाचाही समावेश आहे. धूपारतीची भांडी आकारमानानुसार ५० ते २०० रुपयांपर्यंत आहेत. फुलांसाठी स्टीलच्या परड्या, नंदादीप आणि निरंजनही बाजारात दाखल झाले आहेत.

चांदीच्या दरवाढीचा खरेदीवर परिणाम
पेढीवाल्यांकडे दुर्वांच्या माळा, मोदक, निरंजन तसेच चांदीच्या वस्तू खरेदीसाठी ग्राहकांची नेहमीप्रमाणे गर्दी अद्याप झालेली नाही. चांदीच्या दरातील चढ-उतारामुळे या वस्तूंच्या खरेदीवर परिणाम झाल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे. बाजारपेठेतील काही दुकाने आकर्षक पद्धतीने सजविण्यात आली असली, तरी ग्राहकांच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र आहे. गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला बाजारपेठेत गर्दी वाढण्याची अपेक्षा व्यापाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

Add a concise subheadline
Shorten the price details

Maharashtra Rain: ३ दिवस धो-धो कोसळणार! पावसाबद्दल मोठी अपडेट, राज्यातील 'या' जिल्ह्यांना अलर्ट

Xi Jinping India Visit: शी जिनपिंग यांचा भारत दौरा निश्चित! पंतप्रधान मोदी यांचं निमंत्रण स्वीकारलं, सात वर्षांनंतर देशात येणार

IND vs AFG : भारत-अफगाणिस्तान पहिल्या सामन्यावर संकट! दिल्ली पोलिसांचे पत्र अन् उडाली खळबळ; नेमकं काय घडलं?

Sillod News : पोळ्याच्या दिवशी काळाचा घाला; भराडीच्या १५ वर्षीय विद्यार्थ्याचा तळ्यात बुडून मृत्यू

Marathi News Live Updates : माधुरी हत्तीण वनतारातून नांदणीच्या दिशेने रवाना; मनोज पाटील यांची माहिती

SCROLL FOR NEXT