मुंबई

साळाव–सुपेगाव रस्त्यावर दिशादर्शक फलकांची गरज

CD

साळाव-सुपेगाव रस्त्यावर दिशादर्शक फलकांची गरज
काही ठिकाणी संरक्षक रेलिंग बसविण्याची मागणी
रेवदंडा, ता. १४ (बातमीदार) : मुरूड तालुक्यातील पर्यटनस्थळांकडे जाण्यासाठी महत्त्वाचा असलेल्या साळाव ते सुपेगाव फाटा या सुमारे १४ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण काम जवळपास पूर्ण झाले आहे. मात्र, या मार्गावर अलिबाग, मुरूड व रेवदंडा येथील अंतर दर्शविणारे दिशादर्शक फलक तसेच विविध गावांच्या नावांचे फलक लावण्याची गरज निर्माण झाली आहे. याशिवाय काही ठिकाणी संरक्षक रेलिंग बसविण्याची मागणी होत आहे.
मागील वर्षी पावसाळ्यात महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास मंडळाच्या माध्यमातून या रस्त्याच्या काँक्रीटीकरणाला सुरुवात करण्यात आली होती. या मार्गामुळे मुरूड तालुक्यातील पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या पर्यटकांना अधिक सुरक्षित प्रवासाचा पर्याय उपलब्ध झाला आहे. अलीकडे कुंडलिका खाडी पूल, नागाव बाह्यवळण मार्ग आणि नवेदर बेली येथील पुलावरून अवजड वाहतुकीस बंदी असल्याने मुरूडकडे जाणाऱ्या वाहनचालकांकडून साळाव मार्गाला पसंती दिली जात आहे. मागील काही महिन्यांत सुपेगावमार्गे जाणारा रस्ता खचल्यानेही या मार्गाचा वापर वाढला होता.
पुण्यासह विविध भागांतून खासगी वाहने आणि ट्रॅव्हल्समधून येणारे पर्यटक नागाव, काशिद, रेवदंडा, कोर्लई किल्ला आणि विक्रम विनायक मंदिर या पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी या रस्त्याचा वापर करतात. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी अलिबाग, मुरूड आणि रेवदंडा येथील अंतर दर्शविणारे फलक लावणे आवश्यक आहे. तसेच रस्त्याच्या कामादरम्यान गायब झालेले गावांच्या नावांचे फलक पुन्हा बसवावेत आणि आवश्यक ठिकाणी संरक्षक रेलिंग उभारावे, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel Flight Crew Ban: पाकिस्तानसह मुस्लिम देशांच्या क्रू मेंबर्सवर बॅन! 'फ्लाईदुबई' घटनेनंतर इस्रायल-फ्रान्सने घेतला मोठा निर्णय

केराटिन ट्रीटमेंटसाठी वारंवार पार्लरमध्ये जाण्याची गरज नाही! घरच्या घरी असा बनवा सोपा हेअर मास्क

W,W,W,W,W ! दक्षिण आफ्रिकन गोलंदाजाचा कहर, ट्वेंटी-२०त एकाच षटकात सलग पाच विकेट्स VIDEO

Pune News : कामकाजात दुर्लक्ष भोवले; आरोग्‍य विभागाच्‍या दोन सहाय्यक संचालकांचे निलंबन

Maharashtra Live News : राहुल गांधी लवकरच महाराष्ट्र दौऱ्यावर; राज्यातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांची करणार पाहणी

SCROLL FOR NEXT