मुंबई

रेवदंड्यात लक्ष्मीपूजन उत्साहात

CD

रेवदंड्यात लक्ष्मीपूजन उत्साहात
व्यापाऱ्यांकडून चोपडी पूजन; फुले, कमळे आणि केरसुणीच्या खरेदीला पसंती
रेवदंडा, ता. ८ (बातमीदार) : रेवदंडा परिसरात लक्ष्मीपूजनाचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. घरांची स्वच्छता, रांगोळ्या, पणत्यांची आरास आणि फुलांच्या तोरणांनी परिसरात मंगलमय वातावरण निर्माण झाले होते. व्यापारीवर्गाने लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर चोपडी पूजन करून नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात केली. बाजारपेठेत फुले, कमळे आणि केरसुणीच्या खरेदीसाठी नागरिकांची वर्दळ दिसून आली.
भारतीय संस्कृतीत लक्ष्मीला समृद्धीचे प्रतीक मानले जाते. व्यापार, प्रगती आणि कुटुंबाच्या भरभराटीसाठी या दिवशी लक्ष्मीची पूजा केली जाते. घरातील तिजोरी, हिशोबाची पुस्तके, व्यापारासाठी वापरण्यात येणारी आधुनिक साधने तसेच संपत्तीचे प्रतीक असलेल्या वस्तूंची पूजा करण्याची परंपरा आहे. अन्नधान्य, शेती, पशुधन, जलसंपदा, ज्ञान आणि आरोग्य यांनाही समृद्धीचे महत्त्वाचे घटक मानले जाते.
सायंकाळी व्यापारीवर्गाने पुरोहितांना घरी बोलावून लक्ष्मीपूजन केले. अनेक ठिकाणी चोपडी पूजनाची तयारी करण्यात आली होती. बाजारात विविध प्रकारची फुले आणि कमळे विक्रीसाठी उपलब्ध होती. स्थानिक पिवळ्या व भगव्या झेंडूच्या फुलांची आवक घटल्याने घाटमाथ्यावरील फुलांची खरेदी नागरिकांनी केली. लक्ष्मीपूजनाच्या पारंपरिक विधीसाठी आवश्यक असलेल्या केरसुणीचीही बाजारात मोठ्या प्रमाणावर विक्री झाली.

परंपरेला बाजारपेठेची जोड
लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने घरगुती सजावटीच्या साहित्याबरोबरच पूजेसाठी लागणाऱ्या वस्तूंना मागणी होती. व्यापारीवर्गाने नवीन हिशेबवहीचे पूजन करून आर्थिक वर्षाचा प्रारंभ केला. त्यामुळे धार्मिक परंपरेसोबत बाजारपेठेतही दिवाळीची लगबग पाहायला मिळाली.

रेवदंडा-बातमीदार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Earthquake Latest Update : नागपूर जिल्ह्यात 2.6 रिश्टर स्केलचा भूकंप! तुमच्या भागात जाणवले का धक्के? किती झाले नुकसान?

U19 Asia Cup: IND vs PAK सामन्यात ड्रामा! नॉ-बॉलवर भारतीय फलंदाजाला आऊट दिलं? यशवर्धनच्या विकेटवरून वाद

Tukaram Munde Midnight Raid and First Posting Revelations : आयुक्त तुकाराम मुंढेंचा खळबळजनक गौप्यस्फोट; २००७ मधील पहिल्याच पोस्टिंगच्या वेळी मध्यरात्रीच्या धाडीचा थरारक किस्सा अन् 'त्या' फोन कॉलबद्दल केला खुलासा

Latest Marathi News Live Update: : पार्थ पवारांची शरद पवारांसोबत तब्बल दोन ते अडीच तास महत्त्वपूर्ण बैठक; दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांदरम्यान भेटीने वेधले राजकीय वर्तुळाचे लक्ष

Pimpri Chinchwad fire brigade : गेल्या वर्षी दिवाळीत आगीच्या ७० घटना; यंदा पिंपरी-चिंचवडमध्ये २० अग्निशमन वाहने सज्ज, २२ संवेदनशील ठिकाणांवर २४ तास लक्ष

SCROLL FOR NEXT