मुंबई

सफाई कर्मचारी पुन्हा मूळ जागी

CD

सफाई कर्मचारी पुन्हा मूळ जागी
घनकचरा विभागात हजर राहण्याचे उपायुक्तांचे आदेश
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १५ : महापालिकेच्या घनकचरा विभागातील अनेक सफाई कामगार सध्या प्रभागात फेरीवाला हटाव पथक, अधिकाऱ्यांचे शिपाई, टपालवाहक म्हणून काम करत आहेत. अशा सर्व सफाई कामगारांनी तातडीने आपल्या मूळ नियुक्तीच्या घनकचरा विभागात हजर व्हावे, असे आदेश घनकचरा विभागाचे उपायुक्त अतुल पाटील यांनी सोमवारी (ता. १३) दिले आहेत. त्यामुळे वर्षानुवर्षे लोकप्रतिनिधींच्या आशीर्वादाने प्रभाग कार्यालये, पालिका मुख्यालयात कार्यरत असणाऱ्या कामगारांना आता सफाई काम करावे लागणार आहे.

कल्याण- डोंबिवली शहरे कचरामुक्त करणे, या कामासाठी घनकचरा विभागाला सफाई कामगारांची नितांत आवश्यकता आहे. सध्या पालिकेत कार्यरत असलेले बहुतांशी सफाई कामगार हे ५० वर्षे वयाच्या पुढील आहेत. त्यांची काम करण्याची क्षमता कमी झाली आहे. सफाई कामगार म्हणून कार्यरत असलेले ३५ ते ५० वयोगटातील अनेक सफाई कामगार वर्षानुवर्षे राजकीय पुढाऱ्यांच्या आशीर्वादाने पालिकेच्या मुख्यालयात अधिकाऱ्यांचे दालन, यापूर्वी महापौर, सभापतींच्या दालनात शिपाई, प्रभागात फेरीवाला हटाव पथकात आपली वर्णी लावून तेथेच ठाण मांडून आहेत. घनकचरा विभागाला सफाई कामगारांची आवश्यकता असताना सफाई कामगार प्रभागांमध्ये फेरीवाला हटाव पथक, सहायक आयुक्तांचा शिपाई, टपाली, आवक- जावक लिपिक म्हणून काम करत आहेत. मूळ काम सोडून त्यांना प्रशासकीय कामात सहभागी होण्याची मुभा दिली कोणी, असे प्रश्न काही जागरूक नागरिक उपस्थित करत होते. याविषयी पालिका आयुक्त, घनकचरा विभागाचे उपायुक्त अतुल पाटील यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत. या तक्रारीची गंभीर दखल घेऊन उपायुक्त अतुल पाटील यांनी पालिकेच्या दहा प्रभागांत जे सफाई कामगार अन्य कामे करत आहेत, त्यांनी तातडीने आपल्या मूळ नियुक्तीच्या घनकचरा विभागात हजर होण्याचे आदेश दिले आहेत. सफाई कामगारांची बदली अन्य कोणत्याही विभागात करू नये, असे आयुक्तांचे स्पष्ट आदेश आहेत.

घनकचरा विभागातील सफाई कामगारांनी प्रभागात विनामंजुरी इतर विभागात सहायक आयुक्तांच्या आदेशाने बदली घेतल्यास संबंधित सहायक आयुक्तांवर प्रशासकीय कारवाई प्रस्तावित केली जाईल, असे निर्देश घनकचरा विभागाच्या उपायुक्तांनी दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDA Supplement Alert: खळबळजनक! Amazon वरून खरेदी केलेल्या गोळ्यांमध्ये आढळलं विष; वापर थांबवण्याचं आवाहन

रोहित शर्माने पूर्ण केलं संजू राठोडचं स्वप्न, 'हिटमॅन'सोबतचा व्हिडिओ शेअर करत म्हणाला...'लहानपणीचं स्वप्न...' Viral Video

Akola News : अकोल्यात 'ऑपरेशन टायगर' फत्ते; पक्षाच्या वाढीसाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावे- माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया

आनंदाची बातमी! नागरिकांना घरबसल्या मिळणार दस्ताची प्रमाणित प्रत; राज्यभर राबवण्यात येणार, नेमकी काय आहे सुविधा?

Mumbai Crime: मुंबईत रागातून २ अल्पवयीन मुलांनी मित्राला संपवलं, नंतर हातपाय धुवून मृतदेहाशेजारीच झोपले अन्...; कारण काय?

SCROLL FOR NEXT