मुंबई

डिलिव्हरी बॉय बनून घरात प्रवेश पाणी मागून चेन लंपास

CD

डोंबिवली, ता. २८ : डिलिव्हरी बॉय असल्याचे भासवून घरात प्रवेश मिळवल्यानंतर पाणी मागण्याच्या बहाण्याने घरातील व्यक्तीला दुसऱ्या खोलीत पाठवून बॅगेतील चेन लंपास केल्याची घटना डोंबिवलीतील विष्णूनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. विष्णूनगर पोलिसांनी या चोरीच्या प्रकाराचा अवघ्या बारा तासांत छडा लावत प्रवीण गणेश बोचरे याला अटक केली.

डोंबिवलीचे सहाय्यक पोलिस आयुक्त सुहास हेमाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांनी ऑनलाइन पाण्याची बाटली मागवली होती. प्रवीण हा डिलिव्हरी बॉयच्या वेशात संबंधित व्यक्तीच्या घरी गेला होता. घरात आल्यानंतर त्याने ‘मला दम लागला आहे, पाणी मिळेल का’ अशी विचारणा केली. घरातील व्यक्ती त्याच्यासाठी पाणी आणण्यासाठी गेल्याची संधी साधून त्याने त्यांच्या बॅगेतील साडेचार तोळे वजनाची सोन्याची चेन चोरली आणि तेथून पसार झाला. काही वेळाने चेन चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधित व्यक्तीने विष्णूनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी त्याचा माग काढत प्रवीण बोचरे याला अवघ्या १२ तासांत अटक केली. त्याला कल्याण न्यायालयात हजर केले असता, दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. त्यानंतर तो न्यायालयीन कोठडीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati News : अजितदादांच्या आठवणीने सुनेत्रा पवारांसह बारामतीतील भगिनीही भावुक....

Viral Video: स्टंपची अदलाबदल केली राव, तरी विकेट काही मिळेना! ध्रुव जुरेलचा भन्नाट जुगाड; VIDEO तुफान व्हायरल

शाळेत पाठवण्याऐवजी बारमध्ये नेलं, ग्राहकांसोबत अश्लील हावभाव करायला सांगितलं अन्...; अल्पवयीन मुलीसोबत आत्याचं अमानुष कृत्य

१९ दिवसांपूर्वी लग्न, पती रक्षाबंधनला पत्नीला माहेरी सोडायला निघाला; मिठाई आणायला गेला अन्... नववधू प्रियकरासोबत फरार

Marathi News Live Updates : नागपुरात कंत्राटदारांचा संताप

SCROLL FOR NEXT