मुंबई

विको नाक्याजवळ शेकडो झाडांवर एलईडी रोषणाई

CD

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २९ : कल्याण-शिळ महामार्गावरील विको नाक्याजवळ असलेल्या रिजन्सी अनंतम् गृहसंकुलाच्या परिसरातील शेकडो झाडांवर आणि वेलींवर एलईडी माळांची रोषणाई करण्यात आली आहे. या प्रकारामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होत असल्याचा दावा करत पर्यावरणप्रेमींनी कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन झाल्याचा दावाही तक्रारीत करण्यात आला असून, ही रोषणाई तातडीने हटविण्याची मागणी करण्यात आली आहे.

रिजन्सी अनंतम् गृहसंकुलाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून पुढे सुमारे एक किमीवरील रस्त्याच्या दुभाजकात तसेच रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या मोठ्या आणि छोट्या झाडांवर एलईडी माळा लावण्यात आल्या आहेत. दसऱ्यापासून सुरू करण्यात आलेली ही रोषणाई दिवाळीपर्यंत, म्हणजेच साधारण १२ नोव्हेंबरपर्यंत ठेवण्यात येणार असल्याचे समजते. झाडांवर विद्युत रोषणाई करणे पर्यावरणाच्या दृष्टीने घातक असून, त्यामुळे झाडांसह त्यांवरील जीवसृष्टीवरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे. व्यावसायिक जाहिरातीसाठी पर्यावरणाचे नुकसान होऊ नये, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.

राजू नलावडे, राजीव तायशेटे, माधव घुले, विवेक पंडित, माधव जोशी, अविनाश कुबल, डॉ. सुनील पुणतांबेकर, डॉ. प्रल्हाद देशपांडे, रूपाली शाईवाले आणि भालचंद्र म्हात्रे यांच्यासह पर्यावरणप्रेमींनी हे निवेदन दिले आहे. निवेदनाच्या प्रती महापौर, उपमहापौर, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी, उद्यान अधीक्षक, मानपाडा पोलिस ठाणे आणि रिजन्सी समूहाला पाठविण्यात आल्या आहेत. आता महापालिका प्रशासन यावर कोणती भूमिका घेते, याकडे पर्यावरणप्रेमींचे लक्ष लागले आहे.

कारवाई न झाल्यास न्यायालयात जाणार
झाडांवरील एलईडी माळा तातडीने काढण्यात याव्यात, अन्यथा न्यायालयात दाद मागावी लागेल, असा इशारा पर्यावरणप्रेमींनी दिला आहे. महापालिका क्षेत्रातील अन्य भागांतही अशा प्रकारच्या रोषणाईची तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Youth Congress Protest in Karad Against Sanjay Gaikwad : शेतकऱ्यांच्या वक्तव्याचा निषेध; कऱ्हाडमध्ये आमदार संजय गायकवाड यांच्या पुतळ्याला मांसाचे तुकडे अडकवत युवक काँग्रेसचे आक्रमक आंदोलन

Sakal Impact : 'सकाळ' इम्पॅक्ट; एमपीएससी गैरव्यवहार चौकशीला अखेर मुहूर्त, १६ नोव्हेंबरपर्यंत पुरावे सादर करण्याचे आवाहन

MPSC Student : आर्थिक कोंडीमुळे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी धरली गावाची वाट; अभ्यासिका पडल्या ओस?

Pattankodoli Birdev Yatra Farande Baba Bhakanuk : राज्यासह केंद्रात राजकीय उलथापालथ होईल, देशात आंदोलने होतील; पट्टणकोडोली फरांडे बाबांची भाकणूक उत्साहात संपन्न

Diwali Water Supply Update in Pune : दिवाळीत पुणेकरांना मोठा दिलासा; ५ नोव्हेंबर रोजीची गुरुवारची पाणी कपात रद्द, सुरळीत पाणीपुरवठा होणार

SCROLL FOR NEXT