मुंबई

जनतेच्या समस्या सोडवण्याचे खासदारांचे आवाहन

CD

वडखळ, ता. ९ (बातमीदार) : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत. जेएसडब्ल्यू कंपनीमध्ये स्थानिकांना रोजगार देण्याचे काम करावे, असे आवाहन खासदार सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाच्या उद्‍घाटन प्रसंगी केले. रायगड जिल्हा चिटणीस आत्माराम म्हात्रे यांचे जेएसडब्ल्यू कंपनीच्या गोवा गेटवरील राष्ट्रवादी काँग्रेस झोतिरपाडा विभाग कार्यालयाचे उद्‍घाटन खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी पेण विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष नरेंद्र ठाकूर, तालुकाध्यक्ष दयानंद भगत, जिल्हा उपाध्यक्ष उदय जवके, जिल्हा चिटणीस आत्माराम म्हात्रे, ओबीसी सेलचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष यशवंत घासे, छगन म्हात्रे, मोरेश्र्वर म्हात्रे, प्रकाश बांधणकर, माजी जिल्हा परिषद सदस्य गजानन बोरकर, दत्ताराम म्हात्रे, परशुराम म्हात्रे, तुलशीदास कोठेकर उपस्थित होते. पक्षाचे ध्येय धोरणावर विश्र्वास ठेवणारे तुम्ही कार्यकर्ते आहात. या कार्यालयाचा उपयोग नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी करा. येथील स्थानिकांना येथील कंपनीत रोजगार मिळाला पाहिजे, असे तटकरे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Lodge Raid: कोल्हापूर -गगनबावडा मार्गावर लॉजवर नाजूक प्रकरणातून पोलिसांनी धाड टाकली अन्, एक पिडीत महिला...

'शिवाजी राजं म्हणायचं', 'राजा शिवाजी'मधील सलमान खान प्रेक्षकांना प्रचंड भावला, शत्रूंना म्हणाला...

Latest Marathi News Live Update : मुंबईत १७४५ कोटींचे कोकेन पकडलं, अमित शहांची माहिती

Marathi Language Movement : मराठीचा गौरव वाढवूया ! सकाळ माध्यमसमुहातील 'साम टीव्ही'च्या 'मराठीच बोलू' लोकचळवळीला मिळतोय मोठा प्रतिसाद

New Rule: 1 मेपासून पैशांशी संबंधित मोठे बदल! ATM, UPI, गॅस सिलिंडर ते क्रेडिट कार्ड; काय बदलणार, काय महागणार?

SCROLL FOR NEXT