मुंबई

महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी कटिबद्ध

CD

वडखळ, ता. १८ (बातमीदार) ः महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी केंद्रासह राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन भाजपच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी नुकतेच केले. वडखळ ग्रामपंचायतीतर्फे १५ टक्के मागासवर्गीय निधीतून साहित्य वाटप, ५ टक्के अपंग निधी अर्थसाहाय्य वाटप, इंडिया पोस्ट पेमेंट बँक व विमा पॉलिसी वाटप तसेच पहिल्या मुलीच्या जन्माचे स्वागत आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी त्‍या बोलत होत्‍या.
कार्यक्रमास माजी आमदार धैर्यशील पाटील, भाजपचे उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील, जिल्हा उपाध्यक्ष श्रेया कुंठे, जिल्हा चिटणीस वंदना म्हात्रे, महिला तालुका अध्यक्ष तन्वी पाटील, सरपंच राजेश मोकल, पूजा मोकल आदी उपस्थित होते.
वडखळचे सरपंच राजेश मोकल तसेच ग्रामपंचायतीने अपंग, मागास, महिला अशा समाजातील प्रत्येक घटकाला आपल्या सोबत घेऊन चालण्याचे जे काम केले आहे, ते कौतुकास्‍पद आहे. ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ घोषणेची अंमलबजावणी गावात करण्यात येत असल्‍याबद्दल त्‍यांनी कौतुक केले. जेएसडब्ल्यू कंपनीत स्थानिक तरुणांनाच नोकरी मिळाली पाहिजे, यासाठी पाठपुरावा करणार असल्‍याचे त्‍यांनी शेवटी सांगितले.

महिलांचा दहा लाखांचा विमा
सरपंच राजेश मोकल यांनी, वर्षभरात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विशेषतः महिलांसाठी राबविलेल्या योजनांची माहिती दिली. वडखळ ग्रामपंचायत क्षेत्रातील सर्व महिलांची दहा लाखांचा विमा काढण्याचा निर्णय घेतल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

आज प्रत्‍येक क्षेत्रात महिला उल्‍लेखनीय कामगिरी करीत आहेत. कुटुंबासह समाजात स्‍त्री शक्ती महत्त्वाची असल्‍याचे सांगून माजी आमदार धैर्यशील पाटील यांनी वडखळ ग्रामपंचायतीच्या कार्याचे कौतुक केले. तसेच जेएसडब्ल्यू कंपनीत स्थानिक तरुण बेरोजगारांना नोकरीत प्रथम प्राधान्य देण्यासाठी संघर्ष करणार असल्‍याचे सांगितले.

वडखळ ः ग्रामपंचायतीतर्फे महिलांना वस्तूंचे वाटप करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT