मुंबई

एमआयडीसी प्रकल्पाला शेतकऱ्यांचा विरोध

CD

वडखळ, ता. १५ (बातमीदार) ः औद्योगिक विकास महामंडळामार्फत डोलवी औद्यागिक विकास क्षेत्रासाठी पेण तालुक्यातील खारकारावी, काराव, खारमांचेळा, खारघाट या गावातील ३६७ एकर जमीन संपादित करण्यात येणार आहे. या भूसंपादनाबाबत शेतकर्‌यांना नोटिसा बजावण्यात आल्‍या आहेत. त्यास शेतकऱ्यांनी लेखी हरकत घेत विरोध दर्शवला. यासंदर्भात पेणचे उपविभागीय अधिकारी प्रवीण पवार यांनी, बुधवारी सुनावणी घेतली.
भूसंपादनासाठी औद्योगिक विकास महामंडळामार्फत याआधी ३ व १५ फेब्रुवारी २०२१ रोजी अधिसूचना काढली होती. त्या वेळीही बाधित शेतकऱ्यांनी हरकत घेत विरोध दर्शविला होता. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उद्योग मंत्री व प्रशासनास निवेदन देत उपोषण, जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला तसेच राज्य अधिवेशनात लक्षवेधीद्वारे आमदार जयंत पाटील यांनी शेतकऱ्यांची बाजू मांडली.
ग्रामपंचायतींच्या मासिक सभेतही भूसंपादनाविरोधात ठराव झाले आहेत, स्थानिक आमदार, जिल्हापरिषद सदस्य. पंचायत समिती सदस्य यांनी शेतकऱ्यांना पाठिंबा असल्याचे पत्र दिले आहेत. शेतकऱ्याचा तीव्र विरोध असल्‍याने भूसंपादनाची अधिसूचना रद्द करावी, असे निवेदन शेतकरी संघर्ष समितीतर्फे उपविभागीय अधिकाऱ्यांना बैठकीत देण्यात आले.
या वेळी शेतकरी के. जी.म्हात्रे, चंदू पाटील, गजानन पेडवी, नीलेश पाटील, दिगंबर पाटील, सुनील कोठेकर, गजानन मोकल, सुशील कोठेकर आदी उपस्थित होते. एमआयडीसी प्रकल्पाला आमचा विरोध असून हा प्रकल्प रद्द करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.

हरकतींचा अहवाला सरकारदरबारी पाठवणार
शेतकऱ्यांचे भूसंपदनाबाबत असलेले म्‍हणणे तसेच हरकतींबाबतचा अहवाल सरकारकडे पाठवला जाईल, असे आश्‍वासन या वेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण पवार यांनी दिले. तर शेतकऱ्यांचा विकासाला विरोध नाही, परंतु विकासाचा केंद्रबिंदू शेतकरी असला पाहिजे, त्‍याच्या जमिनीला योग्य भाव मिळाला पाहिजे, त्‍यांना रोजगाराची साधने उपलब्‍ध झाली पाहिजे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते व वास्तुविशारद अतुल म्हात्रे यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK: सूर्यकुमारचा अपमान करणाऱ्या पाकिस्तानी खेळाडूच झाला ट्रोल; आता म्हणतोय, आफ्रिदीला कुत्रा म्हणणाऱ्या इरफान पठाणला...

दीड वर्षही झालं नाही आणि झी मराठीची आणखी एक मालिका घेणार निरोप? अभिनेत्रीच्या भावुक पोस्टमुळे चर्चेला उधाण

6G India : भारतात लवकरच सुरू होणार 6G इंटरनेट; IIT हैदराबादच्या विद्यार्थ्यांनी बनवला प्रोटोटाइप, हे नेमकं आहे तरी काय? जाणून घ्या

Junnar News : जुन्नर तालुक्यातील रस्त्यांना कायदेशीर ओळख; सांकेतिक क्रमांक देणारे बोरी बुद्रुक पहिले गाव

Kirit Somaiya : किरीट सोमय्यांचा आरोप खरा ठरला? मालेगाव बनावट कागदपत्र प्रकरणाचा तपास वेगवान

SCROLL FOR NEXT