मुंबई

पाईपलाईन सुरू असलेल्या भूसंपादनाची प्रक्रिया रद्द करा

CD

पाइपलाइन सुरू असलेल्या भूसंपादनाची प्रक्रिया रद्द करा
वडखळ येथील शेतकऱ्यांचा उपोषणाचा इशारा
वडखळ, ता. १८ (बातमीदार) : येथील एका खासगी कंपनीच्या पाइपलाइनसाठी भूसंपादनाची प्रक्रिया रद्द करावी, या मागणीसाठी पेण उपविभागीय कार्यालयासमोर बाधित शेतकऱ्यांनी उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. याबाबतचे निवेदन जोहेचे माजी सरपंच काशिनाथ पाटील यांनी अधिकारीवर्गाला दिले आहे.
येथील एका खासगी कंपनीची पाइपलाइन पेण तालुक्यातील रावे, कोपर, डावरे, हनुमानपाडा, जोहे, कळवे, कणे, बोझे, ओढांगी, वाशी, बोरी, वडखळ, शिर्की, बोर्वे, मसद आदी गावांतील शेतकऱ्यांच्या सुपीक शेतजमिनीतून जात आहे. या पाइपलाइनसाठी पेण तालुक्यांतील १४ गावांतील अनेक शेतकऱ्यांची जमीन संपादित होणार आहे. हे सर्वच शेतकरी अत्यल्प भूधारक शेतकरी आहेत. या सुपीक शेतजमिनी शेतकऱ्यांसाठी उदरनिर्वाहाचे साधन आहे. या जमीन संपादनामुळे या सर्व गावांतील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. त्यामुळे या भूसंपादनासाठीच्या प्रक्रियेला शेतकऱ्यांचा पूर्णपणे विरोध आहे. याप्रकरणी वेळोवेळी शेतकऱ्यांनी संबंधित प्रशासनाला कळविले आहे. मात्र स्‍थानिक प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. जमीन संपादनाकरिता यापूर्वी उपजिल्हाधिकारी तथा सक्षम प्राधिकारी यांच्याकडून संबंधित शेतकऱ्यांना सुनावणीच्या नोटीस बजावणे, शेतकऱ्यांच्या प्राप्त हरकतींवर सुनावणी घेण्याचे काम पूर्ण झाले आहे. संपादनाच्या प्रत्येक टप्प्यावर संबंधित शेतकऱ्यांनी आतापर्यंत या सर्व प्रक्रियांना शांततेच्या मार्गाने रीतसर लेखी व तोंडी विरोध नोंदवला आहे. असे असतानाही जबरदस्तीने हा प्रकल्प शेतकऱ्यांच्या माथी मारला जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maoist Song Dance Pune: पुण्यातील वसतिगृहात माओवादी आशय असलेल्या गाण्यावर नृत्य; Video Viral

SBI Whatsapp : स्टेट बँकेत अकाऊंट आहे? तुमच्यासाठी मोठी खुशखबर; घरबसल्या व्हॉट्सॲपवर होणार सगळं काम, पाहा काय आहे नवी सुविधा

Latest Marathi News Update: नऱ्हे येथे पीएमपी बस अपघात; चालकाला फिट आल्याने बस कठड्यावर धडकली

स्वतः वाघ्या म्हणून काम केलं, महिलांचं शोषण जवळून पाहिलं; दिग्दर्शक अभिषेक जावीरने सांगितला 'फुला'चा थरार!

Beed News: परफेक्ट च्या शोधात अनेक जण रिजेक्ट; तरुणींच्या अटींमुळे तरुणांचे वय चालले वाढत; शेतकरी मुलांना नकारच

SCROLL FOR NEXT