मुंबई

पेण शहरात पोलिसांचा रूट मार्च

CD

पेण शहरात पोलिसांचा रूट मार्च
कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी दंगा नियंत्रणाची रंगीत तालीम
वडखळ, ता. २७ (बातमीदार) : पेण नगर परिषद निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असून राजकीय वातावरण तापलेले असतानाच निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्याच्या दृष्टीने पोलिस प्रशासनाने कंबर कसली आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पेण पोलिस उपविभागीय अधिकारी जालंदर नालकूल यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पेण पोलिस निरीक्षक संदीप बागुल यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरात भव्य रूट मार्च काढण्यात आला. या दरम्यान दंगा नियंत्रणासाठी विशेष प्रात्यक्षिकेही सादर करण्यात आली.
या रूट मार्चमध्ये डीवायएसपीसह तीन पोलिस निरीक्षक, सहा सहाय्यक पोलिस अधिकारी, २४ पोलिस अंमलदार तसेच वडखळ आरएसपी पथकातील कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. निवडणूक काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, या उद्देशाने हा रूट मार्च काढण्यात आला. उपविभागीय पोलिस अधिकारी जालंदर नालकूल यांच्या उपस्थितीत हा रूट मार्च पेण एसटी स्टँड येथून सुरू झाला. त्यानंतर नगरपालिका कोतवाल चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक चौक, चावडी नाका, हनुमान आळी, महावीर मार्ग, कौंडाल तलाव परिसर, राजू पोटे मार्ग असा मुख्य मार्ग घेत पुन्हा पेण एसटी स्टँड येथे त्याचा समारोप करण्यात आला. रूट मार्चनंतर पेण बसस्थानक परिसरात दंगा काबू नियंत्रणासाठी रंगीत तालीम (मॉक ड्रिल) घेण्यात आली. यामध्ये संभाव्य आपत्कालीन परिस्थितीचा सामना कसा करावा, जमावाला कसे नियंत्रित करावे, परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी कोणती पावले उचलावीत, याची सविस्तर प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. निवडणूक कालावधीत पोलिस प्रशासन पूर्णपणे सज्ज असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये व शांततेत निवडणूक प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याच्या भावात मोठी घसरण! सर्वसामान्यांना दिलासा; पाहा आजचा ताजा भाव

किती क्युट! शशांक केतकरची लेक सेम टू सेम त्याच्यासारखीच, नाक, डोळे पाहून नेटकरी म्हणाले... Viral Video

Mumbai Doctor Case : 'तुझा पुरुषी अहंकार आता तरी..'; मुंबईतील डॉक्टर तरुणीने घेतला गळफास, 6 पानांच्या सुसाईड नोटमध्ये काय? स्तुतीसोबत असं का वागला प्रियकर फैजुल खान?

Jalgaon मुंबई-नागपूर महामार्गावर अर्टिगा कारने चौघांना उडवलं, दोन नंबर प्लेट अन् गाडीत पोलिसांच्या काठ्या

Kim Jong Un missile test : किम जोंग उन अमेरिका -इराण युद्धात उतरणार? क्षेपणास्त्रांच्या केल्या चाचण्या, किम जोंग यांची मुलगी उपस्थित

SCROLL FOR NEXT