मुंबई

गडब ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी कीर्ती म्हात्रे

CD

काराव–गडब ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी कीर्ती म्हात्रे
वडखळ, ता. १० (बातमीदार) ः पेण तालुक्यातील काराव–गडब ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी कीर्ती किशोर म्हात्रे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. विद्यमान उपसरपंच सिता पाटील यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर झालेल्या निवड प्रक्रियेत कीर्ती म्हात्रे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. ग्रामपंचायतीत सलोखा व ऐक्याचे वातावरण राखत ही निवड शांततेत पार पडली.
निवडीच्या वेळी सरपंच मानसी पाटील, सदस्य सिता पाटील, भाग्यश्री कडू, दीपक कोठेकर, जगदिश कोठेकर, मनोज म्हात्रे, दिनेश म्हात्रे, मनोहर पाटील, संध्या म्हात्रे, वैशाली म्हात्रे, परशुराम मोकळ, मुक्ताबाई वाघमारे तसेच ग्रामसेवक कृष्णा पाटील यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती. ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत नवीन उपसरपंचांचे हार्दिक स्वागत केले. नवनिर्वाचित उपसरपंच कीर्ती म्हात्रे यांनी गाव विकासाबाबत आपली स्पष्ट भूमिका मांडताना म्हटले, काराव–गडब ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावातील सर्व प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी मी सतत प्रयत्नशील राहणार आहे. येत्या काळात विकासकामांना अधिक गती देण्याचे आमचे ध्येय आहे. त्यांच्या या आश्वासनाचे ग्रामस्थांनी मनापासून स्वागत केले. कीर्ती म्हात्रे यांच्या बिनविरोध निवडीबद्दल काराव–गडब पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी, सामाजिक संस्था, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी तसेच ग्रामपंचायत सदस्यांनी शुभेच्छा देत अभिनंदनाचा वर्षाव केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Odisha Tragedy : ओडिशात मोठी दुर्घटना ! रुग्णालयाला भीषण आग; ICU मधील १० रुग्णांचा गुदमरुन मृत्यू

Dubai Airport Drone Attack : दुबई विमानतळावर इराणचा ड्रोन हल्ला ! आकाशात धुराचे लोट, विमानसेवा विस्कळीत

Sambhajinagar Hostel Mess 'Mess': CIPET वसतिगृहात धक्कादायक प्रकार: विद्यार्थ्यांच्या जेवणात अळ्या-मुंगळे; महिनाभरात दहा वेळा घटना

Sambhajinagar News: शहीद सैनिकांच्या मुलांसाठी आनंदाची बातमी: MGM विद्यापीठात 100% मोफत शिक्षणासाठी भारतीय सैन्यदलासोबत करार

Sambhajinagar LPG News: गॅस तुटवड्यावर ‘सकाळ’चा दणका: बुढीलेनमध्ये हॉटेलवर छापा, घरगुती तीन सिलिंडर जप्त

SCROLL FOR NEXT