मुंबई

वडखळमध्ये शासकीय कामांचा खोळंबा

CD

वडखळमध्ये शासकीय कामांचा खोळंबा
तलाठी मंडळ अधिकाऱ्यांचा ऑनलाईन कामकाजावर बहिष्कार
वडखळ, ता. १८ (वार्ताहर) ः रायगड जिल्ह्यातील ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) व मंडळ अधिकारी यांनी सोमवारपासून ऑनलाईन कामकाजावर बहिष्कार टाकला आहे. हे आंदोलन कालबाह्य आणि नादुरुस्त उपकरणांमुळे कामकाजात अडचणी निर्माण झाल्यामुळे करण्यात आले आहे. त्‍यामुळे वडखळमध्येदेखील शासकीय कामांचा खोळंबा झाल्याचे सांगण्यात येत आहे.
महाराष्ट्र राज्य तलाठी संघाच्या वतीने रायगड जिल्हा अध्यक्ष संजय शिंगे यांनी पेण तहसीलदारांना निवेदनाद्वारे याबाबत माहिती दिली. ऑनलाईन कामकाजावर बहिष्कार केल्यामुळे ई-पिक पाहणी, ई-हक्क, ई-पंचनामा, सातबारा फेरफार यांसारखी कामे थांबली असून, नागरिकांच्या शासकीय ऑनलाईन सेवा प्रक्रियेवर मोठा परिणाम झाला आहे. तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी सांगितले की, शासनाने २०१६ ते २०१९ दरम्यान लॅपटॉप, प्रिंटर आणि स्कॅनर उपलब्ध करून दिले होते, परंतु या उपकरणांचा आयुष्यमान पाच वर्षे असल्याचे शासन निर्णय असून, कालबाह्य झालेल्या उपकरणांवर अद्याप नवीन खरेदी प्रक्रिया सुरु नाही. त्यामुळे सुधारित ई-पंचनामा आणि ई-हक्क प्रणालीवर कार्य करणे अत्यंत कठीण झाले आहे. त्‍यामुळे नवीन लॅपटॉप व स्कॅनर प्रिंटर तत्काळ उपलब्ध करणे, कालबाह्य उपकरणांच्या बदलाची प्रक्रिया त्वरित पूर्ण करणे, खरेदी प्रक्रियेत विलंब रोखण्यासाठी विभागीय स्तरावर जबाबदारी निश्चित करणे आदी मागणी यावेळी करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: बंडखोर खासदारांचे कोणतेही पत्र आलेले नाही; ओम बिर्लांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्याचा दावा

Vilas Ghule Murder Case: विलास घुले हत्या प्रकरण! मुख्यमंत्र्यांचा मध्यरात्री फोन अन् आंदोलन स्थगित; पुरवणी जबाबात खासदारपुत्राचे नाव समाविष्ट

Asim Munir: पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर यांच्या हत्येचा इस्रायलकडून कट; शोधपत्रकाराचा दावा, दोन देशातल्या मध्यस्थीचं कारण

Latest Marathi News Update: राज्यासह देशात विदेशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Water Tanker Rate Issue : पाणीटंचाईच्या संकटात टँकरच्या दरांची लूट; नागरिकांमध्ये संताप

SCROLL FOR NEXT