पालघर/जव्हार, ता. १ : मतदार यादीच्या विशेष फेरपरीक्षणामध्ये (एसआयआर) जिल्ह्यातील एकूण दाेन लाख ३७ हजार ६०५ मतदारांपैकी तब्बल सहा लाख ६८ हजार ९०५ मतदार वगळण्यात आले आहेत. अर्थात हे मतदार मृत, स्थलांतरित, अनुपस्थित असून, यामध्ये काही मतदारांनी परीक्षणासाठी अर्ज केले नसल्याचे समोर आले आहे. तसेच अर्ज चुकीच्या पद्धतीने भरलेले आणि यादीत वेगवेगळ्या चुका असणारे, अशा तीन लाख ९२ हजार मतदारांना नावे कायम ठेवण्यासाठी सुनावणीला सामोरे जावे लागणार आहे.
मतदार यादीचे विशेष फेरपरीक्षण सुरू होण्यापूर्वी जिल्ह्यात २३.७६ लाख मतदार नोंदवण्यात आले होते. सर्व मतदारांना अर्जाचे वितरण झाले होते. यापैकी १७ लाख सात हजार १४८ मतदारांचे अर्ज डिजिटल अपलोड झाले आहेत. यांच्यापैकी एक लाख ८५ हजार ३१६ मतदारांच्या नावांमध्ये तांत्रिक चुका, सहा लाख ६८ हजारांच्या जवळपासचे मतदार सापडले नाहीत. तसेच काही मतदारांनी अर्ज सादर केले नाहीत. सहा लाख ६८ हजार मतदार बाद झाल्याने त्यांना मतदार यादीत आपले स्थान कायम ठेवायचे असेल अशा मतदारांना पात्र पुराव्यानिशी महिनाभरात पुन्हा नवीन मतदार नोंदणी अर्ज (नमुना ६) करून मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.
सुनावणीदरम्यान पात्र पुराव्याची गरज
२००२च्या मतदार यादीत स्वतःचे नाव असणाऱ्या ६.२० लाख व आई-वडील किंवा आजी-आजोबा यांच्या नावाचे मॅपिंग संलग्नता असणारे ८.८० लाख (३७ टक्के) मतदारांची मॅपिंग प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र उर्वरित २.०७ लाख मतदारांचे मॅपिंग नसून (अर्जात चुका) त्यामध्ये नालासोपारा विधानसभा क्षेत्रातील १.०५ लाख, वसई विधानसभा क्षेत्रातील ४०,५५३, बोईसर विधानसभा क्षेत्रातील ३३,२१९, पालघर विधानसभा क्षेत्रातील २५,७८२, डहाणू विधानसभा क्षेत्रातील २२,१४६ तर विक्रमगड विधानसभा क्षेत्रातील ९,३६१ मतदारांची मॅपिंग प्रक्रिया झालेली नाही. मतदार यादीत मॅपिंग नसलेल्या तसेच तांत्रिक चुका असणाऱ्या मतदारांना सुनावणीदरम्यान पात्र पुरावा दाखवून स्वतःच्या ओळखीची निश्चिती करता येणार आहे.
विधानसभा - वगळलेले मतदार - तांत्रिक चुका
डहाणू - ३०,१७४-२२,१४७
विक्रमगड - २६,६५८-९,३६१
पालघर - ४८,८५२-२५,७८२
बोईसर -१,५०,५७०-४३,८३०
नालासोपारा - ३,०६,९२१-५५,८७५
वसई -१,०५,७३०-२८,३२२
एकूण -६,६८,९०५-१,८५,३१६
प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध - ३१ ऑगस्ट २०२६
दावे व हरकती दाखल करण्याचा कालावधी- ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६
दावे-हरकतींची सुनावणी व निराकरण- ३१ ऑगस्ट ते २९ ऑक्टोबर २०२६
अंतिम मतदार यादी प्रसिद्ध - ४ नोव्हेंबर २०२६
प्रारूप मतदार यादीत नाव नसल्यास मतदारांनी घाबरून जाऊ नये. ही अंतिम मतदार यादी नसून, पात्र मतदारांना दावे व हरकती दाखल करण्याची संधी उपलब्ध आहे. काही त्रुटी किंवा नाव वगळलेले आढळल्यास शेवटच्या तारखेची वाट न पाहता विहित नमुन्यात तातडीने अर्ज सादर करावा.
- डॉ. इंदुराणी जाखड, जिल्हाधिकारी, पालघर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.