विरार, ता. ९ (बातमीदार) : महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार एमएमएआर क्षेत्रातील रिक्षांच्या मीटरदरात एक रुपयाने वाढ करण्यात आली आहे. त्याचा परिणाम वसई तालुक्यातील शेअर रिक्षांच्या भाड्यावरही होत असल्याने वसई पूर्व, वसई पश्चिम तसेच वसई तालुक्यातील सर्व शेअर रिक्षा मार्गांचे नव्याने सर्वेक्षण करून नवीन भाडेदर निश्चित करावेत, अशी मागणी पालघर जिल्हा श्रमिक ऑटो रिक्षा-टॅक्सी चालक-मालक संघटनेने केली आहे. संघटनेचे पालघर जिल्हाध्यक्ष विजय खेतले यांनी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
शासनाने १ सप्टेंबरपासून मीटरदरात वाढ केल्याने त्याचा परिणाम शेअर रिक्षांच्या भाड्यावर होत असून, तालुक्यात शेअर टॅक्सी रिक्षा पद्धतीने प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. प्रत्येक शेअर रिक्षा मार्गाचे अंतर नव्याने मोजून त्यानुसार भाडे निश्चित करावे, तसेच निश्चित केलेले भाडेदर रिक्षा थांबे व प्रमुख ठिकाणी सूचना फलकाद्वारे स्पष्टपणे प्रदर्शित करावेत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. काही रिक्षाचालकांकडून प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण होईल, अशा पद्धतीने भाडे आकारले जात असल्याच्या तक्रारी असल्याने प्रवासी व रिक्षाचालक या दोन्ही घटकांचा विचार करून न्याय्य व व्यवहार्य भाडेप्रणाली लागू करावी, अशी मागणीही संघटनेने केली आहे. नवीन भाडेदराची अधिकृत माहिती प्रवासी व रिक्षाचालकांना देऊन, भाडेवाढीबाबतच्या गैरसमजांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा संघटनेने व्यक्त केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.