मुंबई

पालघर रुग्णालय मारहाण प्रकरण

CD

पालघर रुग्णालय मारहाण प्रकरण
कुंदन संखेसह २२ जणांना दोन दिवस पोलिस कोठडी

पालघर, ता. १६ : पालघर येथील रिलीफ रुग्णालयातील मारहाण व गोंधळप्रकरणी निलंबित शिवसेना जिल्हाप्रमुख कुंदन संखे यांच्यासह २२ जणांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली, तर राहुल घरत यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. या प्रकरणातील २३ आरोपींना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सुजाता बांदल यांच्यासमोर हजर करण्यात आले. तपासासाठी सर्व आरोपींना पाच दिवसांची पोलिस कोठडी द्यावी, अशी मागणी तपासी अधिकारी तथा पोलिस उपअधीक्षक निशा जाधव यांनी केली होती.

५ सप्टेंबरला दहीहंडी उत्सवादरम्यान गोविंदा पथकातील जखमी सदस्याच्या उपचारावरून रिलीफ रुग्णालयात गोंधळ झाल्याचा आरोप आहे. कुंदन संखे, युवासेनाप्रमुख साईराज पाटील, मनीष (विकी) संखे, राहुल संखे, ऋषभ वारे, शुभम बांदिवडेकर, नगरसेवक नीलम संखे, मनोज घरत आणि इतरांनी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, धमक्या दिल्याचा आरोप आहे. राहुल घरत यांनी रुग्णालयातील कर्मचारी विवेक झिंगा यांना मारहाण केल्याचेही तक्रारीत नमूद आहे. ६ सप्टेंबरला गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर राहुल घरत यांना अटक झाली. तपासादरम्यान पोलिसांनी १२ जणांना ताब्यात घेतले. १२ सप्टेंबरला रोहित राजेंद्र गावित, तर १३ सप्टेंबरला कुंदन संखे यांच्यासह अन्य नऊ जणांना अटक करण्यात आली. आतापर्यंत २३ जणांना अटक करण्यात आली आहे.
........
सीसीटीव्ही तपासणार
गोविंदा पथकातील एका सदस्याचा एमआरआय केल्यानंतर काही पदाधिकाऱ्यांनी त्याला तेथून नेले. त्यानंतर खासगी रुग्णालयात त्याच्यावर मणक्याशी संबंधित शस्त्रक्रिया झाल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. संबंधित वैद्यकीय कागदपत्रे, एमआरआय सेंटर आणि आयसीयूतील सीसीटीव्ही तपासणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच कुंदन संखे यांचे वाहन जप्त करणे आणि आरोपींच्या मोबाईलमधील तांत्रिक माहिती तपासण्यासाठी पाच दिवसांची कोठडी मागण्यात आली.
........
‘तपासाची दिशा भरकटवली जात आहे’
आरोपींच्या वकिलांनी पोलिसांच्या तपासावर आक्षेप घेतला. ठोस पुरावे समोर आलेले नसून, उच्च न्यायालयानेही तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचा युक्तिवाद त्यांनी केला. तपासाची दिशा भरकटवली जात असल्याचा दावाही करण्यात आला. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर न्यायालयाने राहुल घरत यांना न्यायालयीन कोठडी, तर उर्वरित २२ जणांना शुक्रवारपर्यंत दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : कळंबा कारागृहात दंगा- आरडाओरड करण्यास मनाई केल्याने अधिकाऱ्याला मारहाण

Manoj Jarange Patil: मोठी बातमी! हैदराबाद गॅझेटियरमध्ये नावंसुद्धा सापडली; विखे पाटलांसह शिष्टमंडळ हैदराबादला जाणार?

Vidyadhar Anaskar : राज्य सहकारी बँकेचे ५,७४५ कोटींचे विक्रमी नेटवर्थ; ठेवी कमी करण्याचा निर्णय व्यावसायिक गणितातून

पाकिस्तानचं नवीन नाटक! PCB नंतर आता हॉकी संघाने भारतात येण्यास दिला नकार; म्हणतात, आमच्या खेळाडूंना सुरक्षित वातावरण हवंय...

CM Devendra Fadnavis : मनोज जरांगे पाटील यांच्या १३ पैकी १२ मागण्या मान्य! आंदोलन करून गणेशोत्सवावर ताण आणू नका; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

SCROLL FOR NEXT