मुंबई

डहाणू लोकलमध्ये तरुणीवर हल्ला करणारा संशयित अटकेत

CD

डहाणू लोकलमध्ये तरुणीवर हल्ला करणारा संशयित अटकेत
पालघर, ता. १६ : डहाणू-बोरिवली मेमो लोकलमध्ये महाविद्यालयीन तरुणीवर हल्ल्याचा प्रयत्न करून फरार झालेल्या संशयिताला लोहमार्ग पोलिसांनी सोमवारी ताब्यात घेतले. तब्बल १३ दिवसांपासून तो फरार होता. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी त्याचा शोध घेतला. गौरव ऊर्फ सोनू शिवनलाल चव्हाण असे संशयिताचे नाव आहे. त्याने तरुणीवर हल्ल्याचा प्रयत्न केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. १ सप्टेंबरला डहाणूहून बोरिवलीकडे जाणाऱ्या मेमो लोकलच्या द्वितीय श्रेणीच्या डब्यात २० वर्षीय महाविद्यालयीन तरुणी प्रवास करीत होती. त्या वेळी गौरव चव्हाण याने तरुणीकडे लोकल कुठे पोहोचली आहे, अशी विचारणा केली. त्यानंतर तरुणी एकटी असल्याची संधी साधून तिच्यावर हल्ला करून अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. तरुणीने प्रसंगावधान राखत त्याच्या डोळ्यांत बोटे घालून जोरदार प्रतिकार केला. तसेच आरडाओरड केल्याने इतर प्रवाशांचे लक्ष गेले. प्रवाशांनी संशयिताला पकडण्याचा प्रयत्न केला; मात्र वाणगाव स्थानकावर त्याने प्रवाशांशी झटापट करून तेथून पळ काढला होता. या घटनेनंतर तरुणीच्या तक्रारीवरून पालघर लोहमार्ग पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : कळंबा कारागृहात दंगा- आरडाओरड करण्यास मनाई केल्याने अधिकाऱ्याला मारहाण

Manoj Jarange Patil: मोठी बातमी! हैदराबाद गॅझेटियरमध्ये नावंसुद्धा सापडली; विखे पाटलांसह शिष्टमंडळ हैदराबादला जाणार?

Vidyadhar Anaskar : राज्य सहकारी बँकेचे ५,७४५ कोटींचे विक्रमी नेटवर्थ; ठेवी कमी करण्याचा निर्णय व्यावसायिक गणितातून

पाकिस्तानचं नवीन नाटक! PCB नंतर आता हॉकी संघाने भारतात येण्यास दिला नकार; म्हणतात, आमच्या खेळाडूंना सुरक्षित वातावरण हवंय...

CM Devendra Fadnavis : मनोज जरांगे पाटील यांच्या १३ पैकी १२ मागण्या मान्य! आंदोलन करून गणेशोत्सवावर ताण आणू नका; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

SCROLL FOR NEXT