पाणी कपातीची टांगती तलवार
वसई-विरारममध्ये अभ्यास समितीची स्थापना
विरार ता.२२ (बातमीदार)ः राज्यातील संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी राज्य सरकारने १० टक्के पाणी कपातीचा आदेश जारी केला आहे. याबाबत वसई-विरार पालिकेच्या महासभेत प्रस्ताव ठेवण्यात आला असून अभ्यास समितीच्या अहवालानंतर आठ दिवसांनंतर पाणीकपातीचा निर्णय होणार आहे.
एल-निनोच्या संभाव्य प्रभावामुळे पर्जन्यमानात घट होण्याची शक्यता आहे. मर्यादित जलसाठे लक्षात घेत राज्य सरकारने १६ ऑक्टोबरपासून १० टक्के पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांना देखील याबाबतचा निर्णय घेण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे पाणी कपातीबाबतच्या नियोजनासाठी बुधवारी (ता.२१) महासभेत प्रशासनाने प्रस्ताव मांडला. या वेळी शहरात पाणी कपात केल्याचे काय परिणाम होतील, याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच निर्णय घेण्याच्या दृष्टीने सभागृह नेते, विरोधी पक्षनेते, स्थायी समिती सभापती, गटनेत्यांची समिती सखोल अभ्यास करून आठ दिवसांत अहवाल सादर करणार आहे.
--------------------------
शहरातील जुन्या विहिरींची स्वच्छता करून पुनर्जीवित करणे, तलावांची स्वच्छता, बावखळांची सफाई करण्यात येणार आहे. तसेच सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित करून त्याचे पाणी बांधकामासाठी वापरले जाणार आहे.
- अजीव पाटील, महापौर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.