जनता दरबारात समस्यांचा पूर
जिल्हा स्तरावरच प्रश्न सोडविण्याचे नाईक यांचे निर्देश
पालघर, ता. २३ : पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबारात नागरिकांच्या विविध समस्यांबाबत तब्बल एक हजार ५८ अर्ज प्राप्त झाले. महसूल, पाणीपुरवठा, रस्ते, वीज, आरोग्य, शिक्षण आणि जमीनविषयक तक्रारींसह शासकीय योजनांशी संबंधित प्रश्न नागरिकांनी मांडले. या अर्जांवर तातडीने कार्यवाही करून नागरिकांचे प्रश्न जिल्हा स्तरावरच सोडवावेत आणि त्यांना मंत्रालयाचे उंबरठे झिजवावे लागू नयेत, असे स्पष्ट निर्देश नाईक यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाहीर आत्माराम पाटील जिल्हा नियोजन समिती सभागृहात शुक्रवारी (ता. २३) हा जनता दरबार पार पडला. जिल्ह्याच्या विविध भागांतून आलेल्या नागरिकांनी आपल्या समस्या पालकमंत्र्यांसमोर मांडल्या. नाईक यांनी संबंधित विभागप्रमुखांना तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. काही प्रकरणांत तत्काळ निर्णय घेण्यात आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. नागरिकांच्या अडचणी सोडविणे ही प्रत्येक अधिकाऱ्याची जबाबदारी आहे. त्यामुळे प्रत्येक प्रकरण संवेदनशीलतेने हाताळून प्रलंबित प्रश्नांचा जलद निपटारा करावा. विविध विभागांनी परस्पर समन्वय साधून नागरिकांना दिलासा द्यावा, असे निर्देशही नाईक यांनी दिले.
या वेळी आमदार राजेंद्र गावित, आमदार हरिश्चंद्र भोये, जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, जिल्हा पोलिस अधीक्षक यतीश देशमुख, अपर पोलिस अधीक्षक विनायक नरळे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे, उपजिल्हाधिकारी रणजित देसाई यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.