११ गोविंदांसह कॅमेरामनला जामीन
पालघर रुग्णालय मारहाण प्रकरण; काहींच्या अर्जांवर सुनावणी नाही
पालघर, ता. २७ ः शहरातील रिलीफ रुग्णालयात झालेल्या मारहाण प्रकरणात ११ गोविंदांसह एका कॅमेरामनची जामिनावर सुटका झाली आहे. दहीहंडी उत्सवादरम्यान जखमी झालेल्या गोविंदाच्या उपचारांवरून आणि वैद्यकीय तपासणीच्या मुद्द्यावरून रुग्णालयात वाद निर्माण झाला होता. या वादाचे रूपांतर गोंधळ आणि मारहाणीत झाले होते.
या प्रकरणी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना मारहाण, शिवीगाळ तसेच धमकी दिल्याच्या आरोपांनंतर पालघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ११ गोविंदांनी जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता, तर कॅमेरामनने स्वतंत्र अर्ज केला होता. मंगळवारी न्यायालयाने १२ जणांना जामीन दिला. शिवसेनेचे निलंबित पालघर युवासेना प्रमुख साईराज पाटील यांच्याकडून सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. यावर २ नोव्हेंबरला तर राहुल संखे, मनीष उर्फ विकी संखे आणि नगरसेवक नीलम संखे यांच्या अर्जावर सत्र न्यायालयामध्ये ३१ ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. कुंदन संखे, राहुल घरत, ऋषभ वारे, शुभम बांदिवडेकर, मनोज घरत आणि कुंदन संखे यांचा वाहनचालक यांच्या जामीन अर्ज दाखल झाला की नाही याची माहिती अद्याप मिळू शकली नाही. याच प्रकरणात उच्च न्यायालयामध्ये महाराष्ट्र मेडिकल असोसिएशनकडून याचिका दाखल असून, याची सुनावणी सुरू आहे. सुनावणीमध्ये पोलिस महासंचालक सदानंद दाते यांनी पोलिस डायरीच्या मुद्द्यावर एक प्रतिज्ञापत्र सादर केले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.