मुंबई

वसईच्या भूजलाची व्यावसायिक लूट रोखण्याची मागणी

CD

वसईच्या भूजलाची व्यावसायिक लूट रोखण्याची मागणी

एलायस डिसिल्व्हा यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

विरार, ता. ३० (बातमीदार) : वसई तालुक्याच्या ग्रामीण भागात विहिरी आणि बोअरवेलमधून बेसुमार भूजलउपसा करून टँकरद्वारे तसेच आर.ओ. प्लांटच्या माध्यमातून पाण्याची व्यावसायिक विक्री केली जात असल्याच्या प्रकारांना आळा घालावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते एलायस जोसेफ डिसिल्व्हा यांनी पालघर जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. या संपूर्ण व्यवहाराची चौकशी करून नियमबाह्य पाणीउपसा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी निवेदनातून केली आहे.वसईच्या ग्रामीण भागातील भूजलस्रोतांवर व्यावसायिक पाणीउपशाचा ताण वाढत असून, काही ठिकाणी टँकरद्वारे बांधकामांसाठीही मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा केला जात आहे. भूजलाचा हा अनियंत्रित उपसा कायम राहिल्यास स्थानिक विहिरी आणि बोअरवेल आटण्याचा धोका असून, भविष्यात नागरिकांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागू शकते, अशी चिंता डिसिल्व्हा यांनी व्यक्त केली आहे.

पिण्याच्या पाण्याच्या हक्काला प्राधान्य द्या

भूजल हा मर्यादित नैसर्गिक स्रोत असून, त्याच्या संरक्षणासाठी प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलण्याची गरज आहे. ग्रामीण नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या हक्कावर व्यावसायिक पाणीउपशामुळे गदा येऊ नये, यासाठी नियमबाह्य प्रकारांवर निर्बंध घालावेत. निवेदनावर कार्यवाही करून सविस्तर लेखी अहवाल द्यावा; अन्यथा नागरिकांना सोबत घेऊन लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा डिसिल्व्हा यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra School Diwali Vacation District Wise : शाळांच्या दिवाळी सुट्ट्यांबाबत पालकांमध्ये संभ्रम; तुमच्या जिल्ह्यात शाळा कधी बंद होणार अन् कधी सुरू? पाहा जिल्ह्यानिहाय संपूर्ण यादी!

CBSE Class 10 Syllabus Change: 'सीबीएसई'च्या परीक्षा पद्धतीत मोठे बदल! दहावीच्या अभ्यासक्रमातून 'पर्यावरण शिक्षण' विषय वगळला, व्यावसायिक शिक्षण अनिवार्य

Tukaram Mundhe on MPSC Paper Leak : एमपीएससी पेपरफुटी प्रकरणात तुकाराम मुंढे ॲक्शन मोडमध्ये! थेट 'या' ९ परीक्षांची होणार कसून चौकशी; १६ नोव्हेंबरपूर्वी पुरावे देण्याचे कडक आवाहन

Smile Day : खळखळून हसा! एक नोव्हेंबरला साजरा करा ‘स्माइल डे’; ‘सकाळ माध्यम समूहा’चा उपक्रम

ChatGPTचा सल्ला ठरला जीवघेणा! ३१ वर्षीय महिलेचा मृत्यू; एआयवर विश्वास ठेवणे ठरतेय धोकादायक

SCROLL FOR NEXT