मुंबई

रौप्यमहोत्सवी दिवाळी पहाट रंगली

CD

रौप्यमहोत्सवी दिवाळी पहाट रंगली

पहाटेच्या सुरेल मैफलीत संगीतप्रेमी तल्लीन

विरार, ता. ९ (बातमीदार) : अमर संगीत कला मंडळ आणि वसई-विरार महापालिकेच्या वाचनालय विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रौप्यमहोत्सवी दिवाळी पहाट कार्यक्रम नालासोपाऱ्यातील सामवेदी ब्राह्मण संघाच्या पटांगणात उत्साहात पार पडला. गेली २५ वर्षे अविरतपणे सुरू असलेल्या या उपक्रमाने यंदाही पहाटेच्या प्रसन्न वातावरणात संगीतप्रेमींना सुरेल मेजवानी दिली. नाट्यसंगीत, अभंग, भावगीते आणि शास्त्रीय संगीताच्या सादरीकरणाने उपस्थित रसिक भारावून गेले.
सुप्रसिद्ध गायक अभिषेक काळे आणि गायिका नीलाक्षी पेंढारकर यांनी आपल्या सुरेल गायनातून विविध संगीतप्रकारांची बहारदार अनुभूती दिली. त्यांना सुशील गद्रे (ऑर्गन), रूपक वझे (तबला), सर्वेश तांडेल (पखवाज), पुरुषोत्तम वाघ (व्हायोलिन) आणि दीपक पाटील (तालवाद्य) यांनी उत्कृष्ट साथसंगत केली. चिन्मय पाटील यांनी प्रभावी निवेदनातून कार्यक्रमात रंगत आणली, तर नरेश पाटील यांनी ध्वनी संयोजनाची जबाबदारी सांभाळली.
या वेळी आमदार राजन नाईक, उपमहापौर मार्शल लोपीस, विरोधी पक्षनेते मनोज पाटील, आरोग्य सभापती नीलेश देशमुख, सामवेदी ब्राह्मण संघाचे अध्यक्ष अनंत पाटील, स्वामी समर्थ मठाचे संस्थापक संदीपदादा म्हात्रे यांच्यासह अनेक मान्यवर आणि संगीतप्रेमी उपस्थित होते. मंडळाचे मार्गदर्शक सुभाष वझे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महापालिकेकडून कार्यक्रमासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आरोग्य सभापती नीलेश देशमुख यांचे मंडळाच्या वतीने विशेष आभार मानण्यात आले.
‘नमन नटवरा’ या नांदीने कार्यक्रमाची सुरुवात झाली, तर ‘कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर’ या भैरवीने सुरेल मैफलीची सांगता झाली.

Diwali Bank Holiday: नोव्हेंबरमध्ये बँकांना सुट्ट्यांची मेजवानी! महाराष्ट्रासह 'या' ३ राज्यांत राहणार बंद; पाहा संपूर्ण वेळापत्रक

Rocket Firecrackers Ban: दिवाळीच्या उत्साहावर नियमांचं बंधन! मुंबईत रॉकेट फटाक्यांवर बंदी; महापालिकेचा मोठा निर्णय

Gokul Politics : "गोकुळचं दार मी उघडलं म्हणून..."; महायुतीच्या दोन बड्या मंत्र्यांवर सतेज पाटलांचा थेट प्रहार!

Mumbai Airport: मुंबईतून परदेशात जाणाऱ्या 'त्या' प्रवाशांना आता नवी मुंबई गाठावी लागणार? १२ कंपन्यांचा विरोध का?

Maharashtra Live News: अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये फटाक्यांच्या पैशांवरून झालेल्या वादातून रक्तरंजित हल्ला; एकाचा उपचारादरम्यान मृत्यू, तर दोघे गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT