कंत्राटी कर्मचाऱ्यांचे हित जपणार
वयोमर्यादा शिथिल करण्यासह विशेष प्रशिक्षणाची तरतूद
विरार, ता. ११ (बातमीदार) : वसई-विरार महापालिकेतील गट-क संवर्गातील पदे टीसीएस-आयओएनमार्फत सरळसेवा पद्धतीने भरण्याच्या निर्णयावर आयोजित विशेष सर्वसाधारण सभेत सविस्तर चर्चा झाली. या भरती प्रक्रियेत वर्षानुवर्षे सेवा देणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांसह स्थानिक भूमिपुत्रांवर अन्याय होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल, अशी ग्वाही महापौर अजीव पाटील यांनी दिली.
सभेत नगरसेवकांनी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भवितव्याबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना महापौरांनी त्यांच्या हितरक्षणासाठी विशेष तरतुदी करण्याचे संकेत दिले. सध्या महापालिकेत कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना भरती प्रक्रियेत वयोमर्यादेत सवलत देण्यासह त्यांच्या दीर्घकालीन अनुभवाचा विचार करून परीक्षेत अतिरिक्त गुण देण्याबाबत प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्यामुळे अनुभवी स्थानिक कर्मचाऱ्यांना सरळसेवा भरतीत संधी मिळण्यास मदत होईल.विशेष म्हणजे, भरती परीक्षेत कंत्राटी कर्मचारी अनुत्तीर्ण झाले किंवा अपात्र ठरले, तरी त्यांची सध्याची नोकरी जाणार नाही. ते पूर्वीप्रमाणेच कंत्राटी पदावर कार्यरत राहतील, अशी स्पष्ट हमी महापौरांनी दिली. तसेच स्थानिक भूमिपुत्र आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करता यावी, यासाठी महापालिकेतर्फे विशेष प्रशिक्षण व अभ्यासवर्ग आयोजित करण्यात येणार आहेत.
कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भवितव्याचा प्रश्न गंभीर असल्याने घाईने निर्णय न घेता त्यांच्या हिताचे संरक्षण करणाऱ्या तरतुदींचा विचार करण्यात येत असल्याचे महापौरांनी स्पष्ट केले. भरती प्रक्रियेत पारदर्शकता राखतानाच स्थानिकांना न्याय आणि विद्यमान कर्मचाऱ्यांना रोजगाराची सुरक्षितता देण्याची भूमिका महापालिका प्रशासनाची असल्याचे त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.