मुंबई

टीसीएस भरतीवरून सभेत खडाजंगी

CD

टीसीएस भरतीवरून सभेत खडाजंगी

बविआच्या बहुमताने प्रस्ताव मंजूर

विरार, ता. ११ (बातमीदार) : वसई-विरार महापालिकेतील गट-क संवर्गातील रिक्त पदे टीसीएस-आयओएनमार्फत सरळसेवा पद्धतीने भरण्याच्या प्रस्तावावरून सोमवारी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. स्थानिक तरुणांना प्राधान्य, विद्यमान कर्मचाऱ्यांचे भवितव्य आणि प्रशासकीय खर्चाच्या मर्यादेवरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली, मात्र बविआच्या बहुमताच्या जोरावर हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
भरती प्रक्रिया टीसीएसमार्फत राबविल्याने पारदर्शकता येणार असली, तरी स्थानिक तरुणांना संधी मिळावी आणि महापालिकेत वर्षानुवर्षे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची वेळ येऊ नये, अशी भूमिका अनेक सदस्यांनी मांडली. विरोधी पक्षनेते मनोज पाटील यांनी प्रस्ताव मंजूर करण्यापूर्वी विद्यमान कर्मचाऱ्यांच्या कामाची चाचणी घेण्याची मागणी केली. तसेच महापालिकेचा आस्थापना खर्च शासनाच्या नियमानुसार ३५ टक्क्यांच्या मर्यादेत कसा राखला जाणार, याचे स्पष्टीकरण प्रशासनाने आधी द्यावे, असा आग्रह त्यांनी धरला. विरोधकांच्या आक्षेपांनंतरही महापौरांनी प्रस्ताव मतदानासाठी ठेवला. या वेळी बहुजन विकास आघाडीच्या ५८ नगरसेवकांनी प्रस्तावाच्या बाजूने, तर भाजपच्या ३८ नगरसेवकांनी विरोधात मतदान केले. अखेर बहुमताने पदभरतीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
दरम्यान, मागील १० ते १५ वर्षांपासून बाह्य यंत्रणेमार्फत महापालिकेत कार्यरत असलेल्या अनुभवी कंत्राटी कर्मचाऱ्यांना सरळसेवा भरतीत संधी मिळावी, यासाठी वयोमर्यादेत १० वर्षांची विशेष शिथिलता देण्याच्या मुद्द्यावरही सभेत चर्चा झाली. त्यामुळे नव्या भरती प्रक्रियेत स्थानिक भूमिपुत्रांसह विद्यमान कर्मचाऱ्यांच्या हिताचे संरक्षण कसे केले जाणार, हा प्रश्न महत्त्वाचा ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ना भाषा आडवी आली, ना अंतर! आफ्रिकेतील विद्यार्थ्यांनी सादर केला प्रतापगडाचा 'तो' ऐतिहासिक प्रसंग; VIDEO व्हायरल

Turkey Climate Summit : युरोपात उष्णतेची लाट, नेपाळमध्ये महापूर अन् जगासमोर ऊर्जा संकट; हवामान बदलाचा सामना करण्यासाठी तुर्कीयेत जागतिक नेते एकवटले

Latest Marathi News Live Update : लोहारा येथे महिला घरात मृतावस्थेत आढळली; परिसरात हळहळ

उद्या मंगळाचं नक्षत्र परिवर्तन! ५ राशींचं नशीब पालटणार; आर्थिक परिस्थिती सुधारणार, करिअरमध्येही मोठी प्रगती

Yavatmal Student News : मुंबईतील हॉस्टेलमध्ये विद्यार्थ्याचा मृत्यू, कुटुंबीयांचा दोन महिन्यांपासून पाठपुरावा; आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानासमोर आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT