मुंबई

बिरसा मुंडा जयंतीनिमित्त जनजाती गौरव सेवा सप्ताह

CD

पालघर, ता. १२ : क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त पालघर जिल्ह्यात १८ नोव्हेंबरपर्यंत ‘जनजाती गौरव सेवा सप्ताह’ आयोजित करण्यात आला आहे. आदिवासी समाजाचा सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व सांस्कृतिक विकास साधण्यासह शासकीय योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांच्या मार्गदर्शनाखाली एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, जव्हार व डहाणू तसेच जिल्हा प्रशासनाच्या समन्वयातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमानुसार वनमंत्री तथा पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. १३) पात्र लाभार्थ्यांना धनादेश वितरण करण्यात येणार आहे. १४ नोव्हेंबरला आदिवासी स्मारकांची स्वच्छता व दीपोत्सव आयोजित केला आहे. १५ नोव्हेंबरला गडचिरोली येथे राज्यस्तरीय मुख्य कार्यक्रम होणार असून, जव्हार येथे रॅली आणि राजीव गांधी मैदानावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. १६ नोव्हेंबरला तलासरी, डहाणू, जव्हार, विक्रमगड, मोखाडा व वाडा येथे आधारकार्ड आणि शासकीय कागदपत्रांसाठी सेवा शिबिरे भरविण्यात येतील. १७ नोव्हेंबरला आरोग्य व पोषण जनजागृती शिबिरे, तर १८ नोव्हेंबरला आदिवासी आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक सक्षमीकरण दिनाने सप्ताहाची सांगता होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dwayne Johnson Health : 'द रॉक'ला गंभीर आजार झाल्याची चर्चा? २२ किलो वजन घटल्यानंतर व्हायरल दाव्यामागचे खरे सत्य समोर!

Social Media: एका ओळीची पोस्ट अन् थेट PM मोदींचा रिप्लाय; हा नेटकरी आहे तरी कोण?

Sinhgad Institute : अखेर ‘सिंहगड संस्थे’च्या सात महाविद्यालयांवर ‘प्रशासक’; सात महाविद्यालयांचे व्यवस्थापन शासनाच्या ताब्यात

ISC & ICSE Exam : ‘आयएससी’ची परीक्षा ९ फेब्रुवारीपासून, तर आयसीएसईची १५ फेब्रुवारीपासून; ‘सीआयएससीई’तर्फे दहावी-बारावीचे वेळापत्रक जाहीर

Latest Marathi News Live Update : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण शक्य नाही; सतेज पाटलांची सडेतोड भूमिका

SCROLL FOR NEXT