मुंबई

दगडखाणीसाठी ८० लाखांची खंडणी

CD

दगडखाणीसाठी ८० लाखांची खंडणी
उपसरपंचासह दोघे अटकेत; खेळण्यातील नोटांनी रचला सापळा
वाडा, ता. १७ (बातमीदार) : तालुक्यातील डोंगस्ते येथे दगडखाण सुरू करण्यासाठी व्यावसायिकाकडे ८० लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी उपसरपंचासह दोघांना मुंबई गुन्हे शाखेने रंगेहाथ अटक केली. ३० लाख रुपयांच्या खेळण्यातील नोटांचा वापर करून पोलिसांनी सापळा रचला. या कारवाईमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. मच्छिंद्र अंकुश पष्टे (४२) आणि वैभव विलास हरड (३७) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. संजय पाटील याच्यासह अन्य साथीदारांचा पोलिस शोध घेत आहेत.
अंधेरीतील व्यावसायिक गिर्राज किशोर अग्रवाल यांनी डोंगस्ते येथे दगडखाणीसाठी जमीन खरेदी केली होती. ग्रामसभा ठराव आणि ना हरकत प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्ज केल्यानंतर आरोपींनी एक कोटी रुपये दिल्याशिवाय काम करू देणार नसल्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. तडजोडीनंतर अग्रवाल यांनी टप्प्याटप्प्याने ३५ लाख रुपये दिले; मात्र प्रमाणपत्रे बनावट असल्याचे समोर आले. त्यानंतर २ सप्टेंबरला पिस्तुलाचा धाक दाखवून पुन्हा ८० लाखांची खंडणी मागितल्याची तक्रार करण्यात आली. मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष ९ने सापळा रचला. गुरुवारी (ता. १५) अंधेरीतील क्रिस्टल प्लाझा येथील रेस्टॉरंटमध्ये ३० लाखांची बॅग घेताना दोघांना अटक करण्यात आली. याप्रकरणी आंबोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolkata Stamped: कोलकात्यात दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी; १७ भाविकांचा मृत्यू

IND vs WI 5th T20I: भारत-वेस्ट इंडिज पाचव्या सामन्याचा निकाल लागला... ९-९ षटकांचा सामना नेमका कुणी जिंकला?

Resort Fire Tragedy : पर्यटकांच्या रिसॉर्टला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांसह १० पर्यटकांचा होरपळून मृत्यू, ९ गंभीर!

Couple Found Dead: पत्नीच्या वाढदिवशीच 'त्या' दोघांनी संपविले जीवन; 'आम्ही जग सोडतोय...!' कोणाला पाठवला ईमेल?

IND vs WI 5th T20I: इशान किशनचे वादळ, मोडला विक्रम; भारताने ९ षटकांच्या मॅचमध्ये किती धावा केल्या? पावसाने पुन्हा घोळ घातला

SCROLL FOR NEXT