मुंबई

कुडूस नाका 45 मीटरचा होणार

CD

कुडूस नाक्याच्या रुंदीला अखेर मुहूर्त
श्रमजीवी संघटनेच्या आंदोलनाला यश
वाडा, ता. १९ (बातमीदार) : भिवंडी-वाडा-मनोर राज्य महामार्गावरील कुडूस नाक्याच्या रुंदीवरून सुरू असलेल्या वादावर अखेर तोडगा निघाला आहे. शासनाच्या नियमानुसार कुडूस नाक्यावर मुख्य रस्ता आणि सेवा मार्गासाठी ४५ मीटरची नियंत्रण रेषा निश्चित करण्यात आली आहे. या निर्णयामुळे ३५ मीटरच्या रेषेला विरोध करणाऱ्या श्रमजीवी संघटनेच्या आंदोलनाला यश आले आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेंद्र किणी यांनी संघटनेला पत्र दिले आहे.
राज्य महामार्गाचे काम प्रगतिपथावर असले, तरी कुडूस नाक्यावरील नियंत्रण रेषेवरून वाद निर्माण झाला होता. प्रशासन, लोकप्रतिनिधी, व्यापारी आणि ५२ गावांतील नागरिकांच्या बैठकीत ३५ मीटरची रेषा निश्चित करण्यात आली होती, मात्र शासनाच्या नियमानुसार ४५ मीटरची जागा राखण्याची मागणी श्रमजीवी संघटनेने केली होती. मागणी मान्य न झाल्यास १९ ऑक्टोबरला रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशाराही संघटनेने दिला होता.
या पार्श्वभूमीवर १३ ऑक्टोबरला वाडा पोलिस ठाण्यात श्रमजीवी संघटनेचे पदाधिकारी, तहसीलदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यात मुख्य रस्त्याचे चौपदरीकरण, सेवा मार्ग, संरक्षक जाळ्या, दुभाजक, गटारे, पदपथ आणि रस्ता ओलांडण्यासाठीची व्यवस्था यांवर चर्चा झाली. त्यानंतर २०११ मध्ये भूसंपादन झालेल्या जमिनीवर ४५ मीटरची नियंत्रण रेषा निश्चित करण्यात आली.
कुडूस नाका ही ५२ गावांची प्रमुख बाजारपेठ असून, अनधिकृत बांधकामे, दुकाने, हातगाड्या आणि अनियंत्रित पार्किंगमुळे येथे वारंवार वाहतूक कोंडी होते. याचा फटका विद्यार्थी, कामगार, व्यापारी आणि आपत्कालीन सेवांना बसतो. परिसरात यापूर्वी झालेल्या अपघातांमध्ये जीवितहानीही झाली आहे. चिंचघर परिसरातील शैक्षणिक संकुलांमध्ये जाणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न गंभीर बनला आहे.

अतिक्रमणांवर कारवाई
कुडूस नाक्यावरील अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणे हटवून ४५ मीटरपर्यंतची जागा मोकळी करण्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने निश्चित केले आहे. अतिक्रमणांकडे दुर्लक्ष करणाऱ्या तत्कालीन अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्याचेही सूचित करण्यात आल्याची माहिती श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते कल्पेश जाधव यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Election Satej Patil : गोकुळच्या मतमोजणी केंद्रावर गोंधळ; सतेज पाटील यांची तातडीने धाव अभिजित तायशेटे आणि अधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी

Gold For India : अचूक निशाणा अन् नवा इतिहास! पॅरा नेमबाज मोना अग्रवालने जिंकलं 'सुवर्णपदक'; पंतप्रधानांची भावूक पोस्ट

Asian Para Games 2026: भारतीय खेळाडूंचा ऍथलेटिक्समध्ये सुवर्ण व रौप्य पदकांचा 'डबल धमाका'! सौम्या, राधा अन् रिंकू-अजीतची कमाल

आजोबांनी आजीसाठी १९६४ मध्ये लिहिलं ८ फूट लांबीचं प्रेमपत्र! ६२ वर्षांनंतरही होतेय प्रेमाची चर्चा; VIDEO VIRAL

Latest Marathi News Live Update : बंटी पाटलांचा महायुतीला दणका! गोकुळ दूध संघ निवडणुकीत समविचारी आघाडीची सत्ता स्थापनेकडे वाटचाल

SCROLL FOR NEXT