मुंबई

चिंचघर ग्रामपंचायतची जलजीवन योजना ठप्प

CD

चिंचघरमध्ये जलजीवन योजना ठप्प
ठेकेदाराचे देयक थकल्याने सहा महिन्यांपासून काम बंद
वाडा, ता. २० (बातमीदार) : वाडा तालुक्यातील चिंचघर ग्रामपंचायतीची जलजीवन मिशनअंतर्गत नळ पाणीपुरवठा योजना ९५ टक्के काम पूर्ण होऊनही निधीअभावी रखडली आहे. सहा महिन्यांपूर्वी जलचाचणी यशस्वी झाल्यानंतरही योजना सुरू न झाल्याने ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. ही योजना तातडीने कार्यान्वित करावी अन्यथा २ नोव्हेंबर २०२६ पासून वाडा पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य मनेश पाटील यांनी दिला आहे.

चिंचघर हे औद्योगिक क्षेत्रातील गाव असून, वाढत्या लोकसंख्येला पुरेसा पाणीपुरवठा व्हावा, यासाठी शासनाने २०२२ मध्ये जलजीवन मिशनअंतर्गत सुमारे साडेतीन कोटी रुपये खर्चाची योजना मंजूर केली होती. या योजनेसाठी सात किलोमीटर अंतरावरील डोंगस्ते लघुपाटबंधारे प्रकल्पातून पाणी आणण्याचे नियोजन करण्यात आले. मे. विंद्या ट्रेडर्स या ठेकेदारामार्फत गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेल्या कामापैकी ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे. सहा महिन्यांपूर्वी योजनेची जलचाचणीही यशस्वी झाली; मात्र ठेकेदाराचे देयक जिल्हा परिषदेकडून अदा न झाल्याने पुढील काम बंद पडले आहे.

ठेकेदाराने आतापर्यंत सुमारे तीन कोटी रुपये स्वतः गुंतविल्याचा दावा करण्यात येत आहे. शासनाकडून निधी उपलब्ध होत नसल्याने देयक थकल्याचे कारण देत ठेकेदाराने काम थांबविले आहे. परिणामी, चाचणी पूर्ण झालेली योजना अद्याप ग्रामस्थांच्या वापरासाठी सुरू होऊ शकलेली नाही.

यंदा संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर ही योजना लवकर कार्यान्वित होणे आवश्यक असल्याचे मनेश पाटील यांनी सांगितले. जिल्हा परिषदेने ठेकेदाराचे थकीत देयक अदा करून उर्वरित काम पूर्ण करण्याचे निर्देश द्यावेत आणि पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे, अन्यथा ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आणि ग्रामस्थांसह आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke: आंदोलनाबाबत अभिजीत दिपकेंची मोठी घोषणा! आता दिवाळीपर्यंत...

मी अजूनची चांगल्या फॉर्मात आहे, मग भारतीय संघात पुनरागमनाची आशा का सोडू? मोहम्मद शमीचं विधान चर्चेत...

Space War : मोबाईलचे जाळे आणि जीपीएस होणार गुल? अवकाशातील वाढत्या संघर्षामुळे जगासमोर मोठे संकट!

Latest Marathi News Live Update : धनंजय मुंडेंचा फार सहन केलं, 'अब हवा का रुख बदल रहा है' म्हणत कोणाला इशारा?

PAK vs ENG : बाबर आझम पुन्हा फेल गेला... पण, एक असा विक्रम ज्यात शुभमन गिलच्या पंक्तीत जाऊन बसला; Video

SCROLL FOR NEXT