Toll Naka Sakal
मुंबई

Mumbai Vehicle Entry : सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार कात्री! आजपासून मुंबईचा वाहन प्रवेश महागणार

मुंबईच्या प्रवेशद्वारावर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या टोल नाक्यावर टोल दरवाढ (ता.१) पासून लागु होणार असल्याने ऐन महागाईतच सर्वसामान्यांची खिशाला कात्री लागणार.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - मुंबईच्या प्रवेशद्वारावर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या टोल नाक्यावर टोल दरवाढ (ता.१) पासून लागु होणार असल्याने ऐन महागाईतच सर्वसामान्यांची खिशाला कात्री लागणार आहे. टोल व्यवस्थापनाचे कंत्राट देतांनाच दर तिन वर्षानंतर टोल दरवाढ ठरवून दिली आहे. त्यानुसारच नियमीत दरवाढ होत असली तरी, रस्त्यांवरील सुविधांचा अभाव असतांना, टोलवाढ का ? असा सवाल सुद्धा उपस्थित होत आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या २७ सप्टेंबर २००२ च्या अधिसूचनेमध्ये दर तीन वर्षांने वाढणाऱ्या टोल दरवाढी लागु केली जाणार आहे. येरोली, दहिसर पच्छिम द्रुतगती मार्ग, पूर्व द्रुतगती मार्ग मुलुंड, लाल बहाद्दूर शास्त्री मुलुंड ठाणे, वाशी सायन पनवेल महामार्गावरील टोल नाक्यावर वाहनांचे टोल दर वाढ होणार आहे. वर्ष २००२ पासून या टोल नाक्यावर टोल वसुली सुरू असून, सुमारे २५ वर्ष का टोल वसूली केली जाणार आहे. यामध्ये वर्ष २००२ मध्ये कार २० रुपये, मिनीबस २५ रुपये, ट्रक बस ४५ रुपये तर अवजड वाहन ५५ रुपये टोल दर होते. तर २०२३ पर्यंत हेच टोल भाडे सध्यास्थितीत कार ४०, मीनीबस ६५ , ट्रक बस १३०, तर अवजड वाहन १६० रुपये वसूल केल्या जात असून, १ ऑक्टोंबर पासून यामध्ये पुन्हा आता वाढ होणार असल्याने ऐन सणासुदीच्या काळात वाढीव टोल दराचा सामना वाहन चालकांना करावा लागणार आहे.

टोल नाक्यावरील दरवाढ अशाप्रकारे

वाहन प्रकार - वर्ष १ ऑक्टोंबर २०२०-२३ - १ ऑक्टोंबर २०२३- ३० सप्टेंबर २०२६ - वाढ

फोर व्हीलर - ४० - ४५ - ५ रुपये

मिनी बस - ६५ - ७५ - १० रुपये

ट्रक/बस - १३० - १५० - २० रुपये

अवजड वाहन - १६० - १९० - ३० रुपये

मासिक पास - १५०० - १६०० - १०० रुपये

वर्ष २०२७ पर्यंत टोल वसूली

टोल चालकांना टोल वसुलीसाठी दिले तेव्हाच दर तीन वर्षांनी टोल दरवाढ केली जाणार असल्याची अधिसूचना आधीच काढली आहे. ज्याप्रमाने १ ऑक्टोंबर पासून मुंबई प्रवेशद्वारावरील टोल नाक्याची दरवाढ केली जाणार आहे. त्याचप्रमाणे १ ऑक्टोंबर २०२६ नंतर पुन्हा टोलदरवाढीचा सामना करावा लागणार असून, वर्ष २०२७ पर्यंत वाढीव टोल भरावा लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रज्वल रेवन्नाचा आणखी एक कारनामा; तुरुंगात जप्त केलेल्या मोबाइलमध्ये सापडले १४५ हून अधिक अश्लील व्हिडीओ

IND vs WI: ऋतुराज गायकवाड, रिषभ पंत, जडेजाचे पुनरागमन होणार? वेस्ट इंडिजविरुद्धच्या ODI मालिकेसाठी का होणार संघात बदल

हरतालिकेची पूजा का करतात? एका क्लिकमध्ये वाचा व्रताचे महत्त्व!

'मी जे केलं ते तुम्ही करू नका...' सिंगल मदरहुडबद्दल नीना गुप्तांचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाल्या...

Marathi News Live Updates : गंगा नदीत बुडणाऱ्या १० बांगलादेशी नागरिकांची वाचवण्यात बीएसएफला यश

SCROLL FOR NEXT