मुंबई

टॉप्स सिक्युरिटी प्रकरण:  MMRDA आयुक्त आर. ए. राजीव यांची आज ईडीकडून चौकशी होण्याची शक्यता

पूजा विचारे

मुंबई:  टॉप्स सिक्युरिटी कंत्राटप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मुंबई महानगर मेट्रोपॉलिटन क्षेत्र विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) आयुक्त आर. ए. राजीव यांना चौकशीसाठी समन्स पाठवले होते. याच  प्रकरणात एमएमआरडीए आयुक्त आर. ए. राजीव चौकशीसाठी हजर राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या चौकशीत ते काय सांगतात आणि त्याचे काय परिणाम होणार, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

या प्रकरणात ईडीने आतापर्यंत दोन जणांना अटक केली आहे. यामध्ये प्रताप सरनाईक यांचे व्यावसायिक भागीदार अमित चांदोळे यांचा समावेश आहे.  २०२० डिसेंबरला ईडीनं शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना समन्स बजावले होते. त्यानंतर त्यांची चौकशीही करण्यात आली होती. त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा पूर्वेश सरनाईकचीही चौकशी केली होती. 

नेमका घोटाळा काय आहे? 

१७५ कोटींच्या कंत्राटासाठी टॉप्स ग्रुपकडून एमएमआरडीएनं ७ कोटींची लाच दिली होती. टॉप्स सिक्युरिटीटे माजी कर्मचारी रमेश अय्यर यांनी २८ ऑक्टोबरला तक्रार दाखल केली होती. दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी एफआयआर दाखल केला होता. 

टॉप्स सिक्युरिटीचे राहुल नंदा यांच्याकडून १०० पैकी केवळ ७० टक्के गार्ड्स वापरले जायचे. ३० टक्के गार्ड्सचा वापर करण्यात येत नव्हता. जवळपास १५० च्या आसपास गार्ड्सचा वापर केला जात नव्हता. मात्र तरीही त्या गार्ड्सची रक्कम सगळी टॉप्सच्या ग्रुपला मिळत होती. त्यातली काही रक्कम लाच म्हणून अमित चांदोळे आणि संकेत मोरे यांना मिळत असल्याची माहिती तपासातून उघड झाली होती. 

Tops security case MMRDA Commissioner R A Rajeev Possibility present ED office questioning today

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

Waluj Nagar Accident : हळद लागण्यापूर्वीच काळाने घातली झडप, दुचाकीच्या अपघातात तरुण ठार

IPL 2024, KKR vs DC Live Score: अक्षर पटेलने दिल्लीला मिळवून दिलं पहिलं यश; सुनील नारायण स्वस्तात बाद

''सत्तेत आल्यास जातनिहाय आणि आर्थिक सर्वेक्षण करू.. राज्य घटना बदलण्याचा भाजप आणि संघाचा कट'', काय म्हणाले राहुल गांधी?

Satara : कऱ्हाडला घुमला 'मोदी...मोदी'चा नारा; महायुतीच्या नेत्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन, रखरखत्या उन्हातही मोठा उत्साह

SCROLL FOR NEXT