मुंबई

Breaking: राज्यातील पोलिसही कोरोनाच्या गर्तेत; बाधितांचे प्रमाण वाढतेच

सकाळ वृत्तसेवा

मुंबईच्या जे जे मार्ग पोलीस स्टेशनचे 12 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी कोव्हिड-19 पाॅझिटिव्ह असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. दरम्यान, या 12 पोलिसांच्या संपर्कातील 44 पोलिसांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. 

शिवाय, लक्षणं आढळून आलेल्या पोलिसांना रुग्णालयात दाखल करण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. जेजे मार्ग पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले हे सगळे पोलीस कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेले 44 पोलिसांना विलग करण्यात आलं आहे. 

दरम्यान, राज्यातील 385 पोलीस कर्मचारी कोरोनाबधित असल्याची माहिती समोर आली होती. 35 पोलीस अधिकारी तर 350 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे ही सांगण्यात आले होते. त्यामुळे हा आकडा आता वाढून 422 वर पोहचला आहे. 

शिवाय, आतापर्यंत राज्यातील 3 पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. काही पोलीस कर्मचाऱ्यांनी कोरोनावर मात केली असुन बधितांचा आकडाही मोठा आहे. त्यामूळे, पोलिसांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला असुन प्रशासनाकडून कोव्हिड योध्यासाठी ठोस उपाययोजनांची गरज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Cricket Schedule : ५ कसोटी, ९ वन डे अन् ८ ट्वेंटी-२०! टीम इंडिया घरच्या मैदानावर पुढील १२ महिन्यांत तगड्या स्पर्धकांना भिडणार...

Mumbai : १७ वर्षीय मुलानं भरधाव वेगात उडवलं, सायकलने जाणाऱ्या उद्योजकाचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीत कैद

Maharashtra Kesari Harshvardhan Sadgir : ‘जुनं खोड’ ठरलं अजूनही भक्कम; हर्षवर्धन सदगीरचा डबल महाराष्ट्र केसरीपर्यंतचा प्रवास

illegal weapons seized : ‘मोका’ अंतर्गत मोठी कारवाई; खून प्रकरणातील गुन्हेगारांकडून पिस्तूल, एडक्यासह चाकू हस्तगत

जळता बकरा अन् कपाळी कुंकू... लखाबाई बनून आलेल्या या अभिनेत्रीला ओळखलंत का? गाजवलाय छोटा पडदा

SCROLL FOR NEXT