tourist demand selfie point at indias longest atal setu vashi sakal
मुंबई

Atal Setu : अटल सेतुवर सेल्फी पॉईंट सुरू करण्याची प्रवाशांची मागणी

निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी ठिकठिकाणी गाड्या थांबवून वाहतुकीसाठी अडथळा निर्माण केल्याचे आढळून येत आहे.

सकाळ वृत्तसेवा

वाशी : शिवडी न्हावा-शेवा ते उरण यांना जोडणारा माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावे नामकरण करण्यात आलेला भारतातील सर्वात जास्त लांबीचा अटल सेतू जितका त्याच्या लांबीसाठी आणि वेगवाग प्रवासासाठी प्रसिद्ध व्हायला हवा त्यापेक्षा जास्त त्यावरील प्रवाशांच्या बेशिस्त वागणुकीमुळे हा सेतू चर्चिला जात आहे.

अटल सेतूचे उद्घाटन नुकतेच १२ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. मात्र अवघ्या तीन-चार दिवसांत बेशिस्त वाहन चालकांनी पुलावरून आसपासच्या निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी ठिकठिकाणी गाड्या थांबवून वाहतुकीसाठी अडथळा निर्माण केल्याचे आढळून येत आहे.

सुरक्षा खांबांवर चढून वाहन चालक व प्रवासी सेल्फी काढताना आढळून येत आहेत तसेच फोटो शूट देखील करताना आढळून येत आहेत. या बेशिस्त वाहन चालकांना आळा बसावा म्हणून वाहतूक पोलिसांतर्फे दोन गस्ती पथके सुद्धा तैनात करण्यात आलेली असून १४४ पेक्षा अधिक वाहनांना कलम १२२/१७७ मोटर वाहन कायद्यानुसार ५०० ते १५०० पर्यंतचा दंड देखील ठोठावण्यात आला आहे.

परंतु वाहन चालकांना या दंडाने विशेष फरक पडलेला दिसून येत नाहीए. उलट वाहन चालक या अटल सेतूवर सेल्फी पॉईंट उभारण्याची मागणी करताना दिसत आहेत. वाहन चालकांच्या मते भविष्यात या ठिकाणी एक उत्तम सनसेट पॉईंट तयार होऊ शकतो व त्याने नागरिकांना आणि पर्यटकांना या निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटता यावा म्हणून सेल्फी पॉईंट किंवा सनसेट पॉईंट तयार व्हावा अशी मागणी वाहन चालकांनकडून करण्यात येत आहे.

या बद्दल नागरिकांच्या विविध चांगल्या-वाईट प्रतिक्रिया येत असल्या तरीही भविष्य काळात या अटल सेतुवरील वाहुक सुरळीत होऊन शिवडी न्हावा-शेवा ते उरण हा प्रवास वेगवान होऊन नवी मुंबई तसेच मुंबईच्या विकासासाठी एक महत्वाचा दुवा ठरेल अशी आशा आहे.

- प्रथमेश गडकरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Red Fort Blast: विमा पॉलिसीमध्ये दहशतवादी हल्ल्यांचा समावेश असतो का?

Mumbai Local: मुंबई लोकलच्या 'या' मार्गावर धावणाऱ्या १५ डब्यांच्या ट्रेनची संख्या वाढणार! नवीन वेळापत्रक कधी जाहीर होणार?

Maldives Airport: विमानतळ ठरेल समृद्धीचे प्रवेशद्वार; मोईझ्झू, भारताच्या सहकार्याने प्रकल्प पूर्ण

Latest Marathi Breaking News : सोलापूर महापालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी आरक्षण सोडत जाहीर.

दिल्ली स्फोटात सेकंड हॅन्ड गाडीचा वापर : जुन्या कारची खरेदी-विक्री करताना 'या' गोष्टी ठेवा लक्षात

SCROLL FOR NEXT