navi mumbai cbd belapur waterfall rescue operation viral video esakal
मुंबई

Mumbai Rescue Operation: नवी मुंबईत धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी गेलेले पर्यटक अडकले; असं झालं रेस्क्यू ऑपरेशन video viral

cbd belapur waterfall viral video: नवी मुंबईतील बेलापूरजवळ आर्टिस्ट कॉलनीच्या मागील बाजूस असणाऱ्या डोंगरात धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी गेलेले 40 ते 50 पर्यटक अडकले

संतोष कानडे

मुंबईः नवी मुंबईतील बेलापूरजवळ असलेल्या धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी गेलेले चाळीस ते पन्नास पर्यटक अडकून पडले आहेत. पाण्याच्या प्रवाह वाढल्यामुळे त्यांना येण्यासाठी वाट मिळत नाही. या पर्यटकांना वाचवण्यासाठी अग्निशमन दलासह पोलिस दल आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे.

नवी मुंबईतील बेलापूरजवळ आर्टिस्ट कॉलनीच्या मागील बाजूस असणाऱ्या डोंगरात धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी गेलेले 40 ते 50 पर्यटक अडकले. मुसळधार पावसामुळे पाण्याचा प्रवाह वाढल्याने पर्यटक अडकले. अग्निशमन दलाचे जवान आणि नवी मुंबई पोलीस घटनास्थळी दाखल झाले .

याशिवाय सामाजिक कार्यकर्त्यांकडूनही रेस्क्यू ऑपरेशनमध्ये मदत होत होती. मदतकार्य वेगाने सुरु होते व दोरखंडाच्या सहाय्याने अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आले. अनेक तास हे रेस्क्यू ऑपरेशन चालले व सायंकाळपर्यंत जवळपास ६० जणांना रेस्क्यू करण्यात आले अशी माहिती आहे.

दुसरीकडे मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे हवेतील दृश्यमानतेवर परिणामझाला आहे. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. रविवारी मेगाब्लॉक असल्याने जलद मर्गावरील वाहतूकसुद्धा धीम्या मार्गावर वळविण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jammu Kashmir: काश्मीरच्या कुलगाममध्ये पुन्हा टार्गेट किलिंग; मजुरांवर दहशतवादी हल्ला, छत्तीसगडच्या तरुणाचा मृत्यू

उपमुख्यमंत्र्याच्या बैठकीला हजेरी, घरी जाताच घेतली ४५ लाखांची लाच; बीडमध्ये विभागीय वनअधिकाऱ्यांला रंगेहात पकडलं

Commonwealth Games 2026: पाच मिनिटांत दुसरे सुवर्ण! हर्ष सिंगची ज्यूदोत 'Golden' कामगिरी; भारतीय जवानाने प्रतिस्पर्धीला आसमान दाखवले

MBBS Bond: एमबीबीएस डॉक्टरांचा ‘बॉण्ड’ अखेर रद्द! राज्य शासनाचा मोठा निर्णय; वाढत्या विद्यार्थी संख्येमुळे धोरणात बदल

Dhom Dam: वाईत धोक्याची घंटा! धोम धरणाचा विसर्ग वाढला; महागणपती मंदिरात घुसले पुराचे पाणी

SCROLL FOR NEXT