File Photo
File Photo 
मुंबई

बलात्कार प्रकरणी दोघा नराधमांना अटक

सकाळ वृत्तसेवा

भिवंडी : भिवंडी शहरातील कुरेशीनगर, कसाईवाडा येथे एका ३१ वर्षीय तरुणीवर दोघा नराधमांनी तीन महिन्यांपूर्वी बलात्कार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी निजामपूर पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून दोघा जणांना अटक केली आहे. आरोपींना दुपारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघा आरोपींना ३० नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

सादीन अंसारी (२५) व खालीद अंसारी (२८)असे बलात्कारप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या नराधमांची नावे आहेत. शहरातील निजामपुरा भागातील कुरेशी नगरमधील राधाबाई बिल्डिंगमध्ये राहणारी तरुणी ही तिच्या कुटुंबीयांसोबत शेजारच्याच घरात राहते.

मात्र, तिच्या कुटुंबीयांच्या मालकीची एक रूम नराधम राहत असलेल्या राधाबाई बिल्डिंगमध्ये असल्याने सदरची तरुणी त्या बिल्डिंगच्या बाथरूममध्ये अंघोळीसाठी आली होती. त्यावेळी सादीन आणि खालीद या दोघांनी तिच्यावर बलात्कार केला. 

या तीन महिन्यांच्या कालावधीत मुलीच्या शारीरिक प्रक्रियेत बदल झाल्याने आईने तिला विश्‍वासात घेऊन सखोल चौकशी केली असता घडलेला प्रकार मुलीने कथन केला.त्यामुळे भयभीत झालेल्या आईने मुलीला निजामपूर पोलिस ठाण्यात नेऊन नराधम सादीन व खालीद या दोघांच्या विरोधात मंगळवारी गुन्हा दाखल केला आहे.

गुन्हा दाखल होताच निजामपूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक (गुन्हे) शंकर इंदलकर यांनी दोघा नराधमांना अटक केली. बुधवारी त्यांना ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता ३० नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi : आघाडीत आतापासूनच ‘तुपा’वरून भांडणे; पंतप्रधान मोदींची टीका

Loksabha Election 2024 : या आहेत सहाव्या टप्प्यातील प्रमुख लढती

Drinking Water : पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य; मुख्यमंत्र्यांनी घेतला टंचाईचा आढावा

Sambit Patra : संबित पात्रांच्या विधानाचे पडसाद मतपेटीवर?

Kalyaninagar Accident : कल्याणीनगरमधील अपघात प्रकरणाच्या तपासासाठी दहा पथके नियुक्त

SCROLL FOR NEXT