Dombivli : डोंबिवली नगरी झाली बालाजीमय ;  sakal
मुंबई

Dombivli : डोंबिवली नगरी झाली बालाजीमय ; श्री बालाजी,भूदेवी आणि श्रीदेवीच्या पारंपरिक विवाह सोहळा डोंबिवलीत संपन्न

श्री निवासा गोविंदा...श्री वेंकटेशा गोविंदा..गोविंदा हरी गोविंदाच्या नादब्रह्मात संपूर्ण डोंबिवली नगरी बालाजीमय झाल्याचे चित्र रविवारी पहायला मिळाले.

शर्मिला वाळुंज : सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली : श्री निवासा गोविंदा...श्री वेंकटेशा गोविंदा..गोविंदा हरी गोविंदाच्या नादब्रह्मात संपूर्ण डोंबिवली नगरी बालाजीमय झाल्याचे चित्र रविवारी पहायला मिळाले. कल्याण शीळ मार्गावरील प्रीमियर कंपनी मैदानावर झालेल्या या अध्यात्मिक सोहळ्याने तसेच श्री बालाजी - भूदेवी आणि श्रीदेवीच्या या पारंपरिक विवाह सोहळ्याने उपस्थित हजारो भक्तांचे डोळ्यांचे पारणे फेडले.

या सोहळ्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषद सभापती नीलम गोऱ्हे यांसह राज्य सरकारमधील अनेक मंत्री हे प्रमूख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या सोहळ्याच्या निमित्ताने भक्तांना डोंबिवलीत बालाची यांचे दर्शन तसेच विवाह सोहळा प्रत्यक्ष पाहता आला अशी भावना यावेळी मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली.

तिरुमला तिरुपती देवस्थान आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून डोंबिवलीत दुसऱ्यांदा श्री श्रीनिवास कल्याणम महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. चार वर्षांपूर्वी हा महोत्सव डोंबिवलीत भरविण्यात आला होता. तिरुपती देवस्थान हे प्रसिद्ध असे धार्मिक स्थळ आहे. तेथे जाऊन प्रत्येकालाच बालाजीचे दर्शन घेता येणे शक्य नसते. या पार्श्वभूमीवर खासदार शिंदे यांच्या पुढाकाराने या महोत्सवाच्या माध्यमातून येथील भक्तगणांना बालाजीचे दर्शन रविवारी घडविले गेले. या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे यासाठी तिरुपती बालाजी देवस्थान येथील पूजेची श्री बालाजी यांची मूर्ती आणण्यात आली होते. त्यासोबतच तिरुपती बालाजी देवस्थान येथील पुजारी आणि देवस्थानचे विश्वस्त, पदाधिकारीही या सोहळ्यासाठी डोंबिवलीत आले होते.

पहाटे व्यंकटेश सुप्रभातम् ने झाला महोत्सवाला प्रारंभ...

व्यंकटेश सुप्रभातम् स्तोत्राच्या अत्यंत पवित्र शब्दोच्चारणात श्रीनिवास कल्याणम् महोत्सवाला रविवारी सकाळी भक्तिपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. ज्याप्रमाणे तिरुपती बालाजी देवस्थान येथे श्री बालाजी यांची पूजा अर्चा केली जाते. अगदी त्याच पद्धतीने आणि तितक्याच भावोत्कटतेने सकाळी या सोहळ्यात सुप्रभातम्, तोमाला, अर्चना आणि अभिषेक विधी संपन्न झाले. ज्यामध्ये खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासह अनेक जण सपत्नीक सहभागी झाले होते.

महाराष्ट्र आणि दाक्षिणात्य संस्कृतीचा शोभायात्रेत मिलाप

श्रीनिवास कल्याणम् महोत्सवात श्री बालाजी आणि लक्ष्मी यांच्या विवाह सोहळ्यानिमित्त डोंबिवलीच्या सागर्ली येथील बालाजी मंदिरापासून ते प्रीमियर ग्राउंडपर्यंत पारंपरिक रथामध्ये भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली. ज्यामध्ये तिरुपती तिरुमला देवस्थान येथील दररोजच्या पूजेतील श्री बालाजी - श्री महालक्ष्मीच्या मूर्तीचा समावेश होता. या शोभायात्रेमध्ये एकीकडे महाराष्ट्रातील संत परंपरेचे जतन करणारा वारकरी संप्रदाय तर दक्षिण भारतातील अनेक धार्मिक रूढी परंपरा यांचे दर्शन घडवणारे देवाचे विविध अवतार, पुतळे बिदुरूगुंबे, हनुमान, शंकर, शेषनाग, नंदी, कलामयम उडपी, मंगलोर यक्षगण आदी पारंपरिक संस्कृती पाहायला मिळाली. या माध्यमातून याठिकाणी महाराष्ट्र आणि दाक्षिणात्य संस्कृतीचा अनोखा मिलाप झालेला दिसला.

श्री बालाजी आणि महालक्ष्मी यांचा पारंपारिक विवाह सोहळा...

श्री श्रीनिवास कल्याणम् महोत्सवातील मुख्य सोहळा आणि त्याचे मुख्य आकर्षण असणाऱ्या श्री बालाजी आणि महालक्ष्मी यांच्या पारंपारिक विवाह सोहळ्याने उपस्थित हजारो भक्तांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. येथील प्रीमियर कंपनी मैदानावर हजारो बालाजी भक्तांच्या उपस्थितीत आणि तिरुपती येथील प्रमुख आचार्यांच्या मंत्रोच्चारात आणि अतिशय मंतरलेल्या वातावरणात हा विवाह सोहळा संपन्न झाला. काकण बंधन, अग्नीसाक्षी, कार्यकारी संकल्प, मंगल वस्त्रअर्पण, कन्यादान, मंगळसूत्र बंधन अशा संपूर्ण विधिवत हा श्री बालाजी आणि श्री महालक्ष्मी यांचा विवाह सोहळा संपन्न झाला. त्यानंतर नयनरम्य आणि आकर्षक फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

ठाणे जिल्ह्यासह विविध भागांतून हजारो भक्तांची गर्दी...

कल्याण शीळ मार्गावरील प्रीमियर मैदानावर झालेल्या या महोत्सवाला केवळ कल्याण डोंबिवलीच नव्हे तर उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, ठाणे , नवी मुंबईसह मुंबई आणि विविध भागांतून हजारो भक्त उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषद सभापती नीलम गोऱ्हे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा, गिरीश महाजन, कृषिमंत्री दादा भुसे, तिरुमला तिरुपती देवस्थानचे अध्यक्ष करुणाकरन रेड्डी, कार्यकारी अधिकारी धर्मा रेड्डी, बोर्ड मेंबर सत्यम, सौरभ बोहरा, आमदार बालाजी किणीकर , आमदार रविंद्र फाटक, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, युवासेना सचिव दिपेश म्हात्रे, पूर्वेश सरनाईक यांच्यासह या सोहळ्यासाठी हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित होते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Patna Road Accident : गंगा नदीत स्नानासाठी जाताना काळाचा घाला! ट्रक-ऑटोच्या भीषण धडकेत 7 महिला जागीच ठार; 4 जणांची प्रकृती गंभीर

स्टार प्रवाहसाठी मालिका नव्हे प्रोडक्शन हाउस महत्वाचं; प्राइम टाइमसाठी टॉप ५ मधली मालिका करणार बंद, नेटकरी म्हणतात- आताच तर...

Marbat 2025: सगळं अशुभ,अमंगळ घेऊन जा..गे मारबत! कोण होत्या राणी बाकाबाई भोसले ज्यांच्यामुळे नागपुरात सुरू झाला अनोखा मारबत?

खुशखबर! Oneplus 13 स्मार्टफोनचा दर उतरला; मिळतोय हजारो रुपयांचा डिस्काउंट; 24GB रॅमचा मोबाईल किंमत फक्त...

Asia Cup 2025: श्रेयस अय्यरला टीम इंडियात संधी मिळाली असती, पण कोणाचा 'हट्ट' नडला? इतर संघांपेक्षा वेगळं करण्यासाठी गेले अन्...

SCROLL FOR NEXT